मावळ तालुक्याचे आमदार सुनिल शेळके यांच्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान निधीतून तसेच नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या विशेष प्रयत्नांनी वडगाव नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक 1 केशवनगर येथील रस्त्याचे आणि ड्रेनेज लाईनचे काम मार्गी लागले आहे. ( Road And Drainage Work Start In Keshavnagar Area of Vadgaon )
वडगाव मावळ शहरातील प्रभाग क्रमांक 1 केशवनगर येथील, रेल्वे गेट ते किसनराव दंडेल यांचे घरापर्यंत तसेच नंदकुमार सोनवणे ते वडगाव हद्दीपर्यंत (वडगाव सांगवी मुख्य रोड ) सुमारे 1 कोटी 44 लाख रुपये खर्चून रेल्वे गेट ते वडगाव हद्दीपर्यंत मुख्य रस्ता डांबरीकरण करणे, तसेच बंदिस्त ड्रेनेज लाईन करण्याच्या कामास खापरे ओढा येथून सुरूवात करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष मयुर ढोरे आणि उपनगराध्यक्ष राजेंद्र कुडे यांनी सद्य स्थितीतील कामाची पाहणी केली. ( Work Start Through MLA Sunil Shelke And Mayor Mayur Dhore )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
संबधित रस्त्याचे काम साधारणतः एक ते दोन महिन्याच्या कालावधीत पूर्ण होणार असल्याने सदरील काम उत्कृष्ट दर्जाचे करण्यासंदर्भात सदर ठेकेदार सुनित कदम यांना काही महत्वाच्या सूचना देखील करण्यात आल्या. तसेच येणाऱ्या काळात केशवनगर येथील विकासकांमासाठी अजून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन नगराध्यक्षांनी या भागातील नागरिकांना दिले. ( Vadgaon Nagar Panchayat )
हेही वाचा – थेट तोडगा! आमदार शेळकेंचे सहकार्य आणि नगराध्यक्ष ढोरेंचे प्रयत्न, वडगावचा पाणी पुरवठा होणार सुरळीत
खूप दिवसांपासून प्रलंबित असलेल्या रस्ता, पाणी आणि बंदिस्त गटार हे विषय मार्गी लागत असल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी नगराध्यक्ष मयुर ढोरे, उपनगराध्यक्ष राजेंद्र कुडे, बजरंग ढोरे आणि प्रभागातील नागरिक उपस्थित होते. ( Road And Drainage Work Start In Keshavnagar Area of Vadgaon Nagar Panchayat Through MLA Sunil Shelke And Mayor Mayur Dhore )
अधिक वाचा –
वडगाव येथे मावळ भाजपची मासिक बैठक संपन्न, तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडेंनी केले ‘हे’ महत्वाचे मार्गदर्शन
वडगावच्या जनआक्रोश रॅलीत आदित्य ठाकरेंचे तुफान भाषण! वाचा संपूर्ण भाषण जसेच्या तसे… ‘तरुणांच्या पाठीवर का वार करताय?’