मावळ तालुक्यातील रेल्वे प्रवाशांच्या विविध प्रलंबित मागण्या लवकरात लवकर मार्गी लावाव्यात, अशी मागणी मावळ तालुका रेल्वे प्रवासी संघाने ( Maval Taluka Railway Passengers Association ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांच्याकडे केली आहे. मावळ तालुका रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष पोपटराव भेगडे, उपाध्यक्ष दीपाली गोकर्ण, पांडुरंग भेगडे, सचिन जोशी, विष्णुपंत गजरे, सोपानराव सावंत आदींनी याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांना निवेदन दिले आहे. ( Maval Taluka Railway Passengers Association Memorandum To CM Eknath Shinde )
पूर्वी पुणे-लोणावळा दरम्यान 44 लोकल गाड्या धावत होत्या. परंतू कोरोना काळात लोकल गाड्यांची संख्या कमी करण्यात आली. मात्र आता परिस्थिती पुर्ववत होत असतानीही लोकल फेऱ्या पुर्ववत करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थी, कामगार, व्यापारी, व्यावसायिक वर्गाची मोठी गैरसोय होत आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
तसेच, सिंहगड एक्स्प्रेसला तळेगाव येथे थांबा देण्यात यावा. सिंहगड एक्स्प्रेसने मुंबईला जाणाऱ्या व्यापारी आणि कामगार वर्गाला आधी लोकलने लोणावळ्याला जाऊन सिंहगड एक्स्प्रेस पकडावी लागते. यादरम्यान त्यांना मोठी धावपळ करावी लागते, त्यात त्यांचे हाल होतात. तालुक्यातील प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन पुणे – लोणावळा दरम्यानची लोकल संख्या पूर्ववत करावी. सिंहगड एक्स्प्रेस तळेगाव येथे थांबवावी, तसेच 1988 पासून मागणी होत असलेल्या घोरावाडी थांब्याला स्थानकाचा दर्जा देण्यात यावा, अशा मागण्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. ( Maval Taluka Railway Passengers Association Memorandum To CM Eknath Shinde for Railway Passengers Various Demands )
अधिक वाचा –
महिलेवर लैंगिक अत्याचार करुन 66 लाखांची फसवणूक, तिघांवर गुन्हा दाखल, दोनजण अटकेत I Dehu Road Police
श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना वार्षिक सभा : ‘मावळ, मुळशीतील अनेक शेतकऱ्यांचे एकरी उत्पादन कमी’