मावळ तालुक्यात ( Maval Taluka ) अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. एका सरपंच ( Sarpanch ) आणि ग्रामसेवकाला ( Gram Sevak ) लाच (Bribe) घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. मावळमधील कुसगांव खुर्द ( Kusgaon Khurd ) येथील ही घटना आहे. कुसगावच्या ग्रामसेवक आणि सरपंच यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti corruption Bureau) रंगेहाथ पकडले आहे.
कुसगाव खुर्द गावचे सरपंच अनिल येवले आणि ग्रामसेवक अमोल थोरात अशी संबंधितांची नावे आहेत. मृत्युचे प्रमाणपत्र देण्यासाठी आठ हजार रुपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना रंगेहाथ पकडले आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; तक्रारदाराने चुलत आजी, आजोबा यांचे मृत्युचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी कुसगांव खुर्द ग्रामपंचायतीकडे अर्ज केला होता. मृत्यु प्रमाणपत्रासाठी केलेला मागणी अर्ज आणि हरकती अर्ज यांच्या प्रती मिळण्यासाठी तक्रारदार यांनी 26 सप्टेंबर 2022 रोजी अर्ज दिला. मात्र, त्यावेळी सरपंच अनिल येवले यांनी दाखले देण्यासाठी दहा हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारीची पडताळणी केली असता, कुसगाव खुर्द ग्रामपंचायतीचे सरपंच येवले यानी दाखले देण्याकरिता 10 हजार रूपयांची मागणी करून तडजोडीअंती 8 हजार रूपये लाच रक्कम स्विकारली. सरपंच येवले यांना लाच मागण्यास ग्रामसेवक थोरात यांनी प्रोत्साहन दिले. या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उप अधीक्षक सीमा आडनाईक करत आहेत. ( Kusgaon Khurd sarpanch and gram sevak arrested while accepting bribe of rs 8000 by Anti corruption Bureau )
अधिक वाचा –
‘सिंहगड एक्सप्रेसला तळेगाव येथे थांबा द्या, पुणे-लोणावळा फेऱ्या पुर्ववत करा’ आदी मागण्यांसाठी मुख्यमंत्री शिंदेंना निवेदन
भाऊ हे कधी झालं? पवनमावळमधल्या जवण ते तुंग मार्गावर अनेक गावांचे विनामागणी नामांतर; नागरिकांना फुकटचा मनस्ताप