मावळ तालुक्यातील ( Maval Taluka ) पवनमावळ ( Pavan Maval ) विभागातील जवण ते तुंग या पट्ट्यात असलेल्या गावांमध्ये सध्या एका विषयाची जोरदार चर्चा सुरु आहे, ती म्हणजे ‘भाऊ आपल्या गावाचं नाव कसं बदललं बरं..’. कदाचित तुम्हाला हे आश्चर्यकारक वाटेल पण हे खरं आहे. जर तुम्ही जवण पासून तुंग ( Jovan to Tung Road ) या गावापर्यंत रस्त्याने गेलात तर तुम्हाला या गोष्टीची खात्री बसेल. तसेच, गावातील कोणत्याही एखादा नागरिकाला हे कसं काय झालं, असे विचारलं तर तेही म्हणतील ‘आम्हालाच समजेना कसं काय झालं’ ( Village Names Misprinted In Marathi and English )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
संपूर्ण प्रकरण काय?
पवनमावळमधील पवना धरणाच्या ( Pavana Dam ) बॅकवॉटर भागात असलेल्या गावांना जोडणारा जवण ते तुंग हा रस्ता नव्याने बनवण्यात आला आहे. अनेक वर्षांनंतर झालेल्या या रस्त्यामुळे येथील नागरिक सुखावले आहेत. परंतू, या सुखापाठोपाठ त्यांना छळणारा एक प्रकार झालाय, तो म्हणजे रस्ता बनवल्यावर रस्त्याच्या बाजूला ठिकठिकाणी लावण्यात आलेले गावांच्या नावाचे फलक.
संपूर्ण रस्त्याचे बांधकाम झाल्यानंतर (अद्याप काही ठिकाणी बांधकाम अपूर्ण आहेच) रस्त्याच्या बाजूला संबंधित गावांच्या ठिकाणी गावाच्या नावाची किंवा थांबा असलेल्या ठिकाणी संबंधित वाडी, वस्ती, गाव यांच्या नावाची पाटी लावण्यात आली आहे. परंतू या पाट्यांवर गावांची नावे ही पुर्णतः बदलून लिहिण्यात आलेले दिसत आहे. ( Village Name Boards on Jovan to Tung Road Are Wrong )
उदा. आजिवली या गावाच्या इथे आजोली असा बोर्ड लावण्यात आला आहे. शिळींब या गावाच्या इथे शिलिंब असा बोर्ड लावण्यात आहे.
हे कशामुळे झाले असावे?
याबाबतीत विचार केला असता असे दिसून येते की, कदाचित हा सर्व गोंधळ गुगल मॅपमुळे झाला असावा. गुगल मॅपच्या आधारे ठेकेदाराने नावे गृहित धरुन ती तशीच प्रिंट केल्याने हा गोंधळ उडाल्याचे दिसते. मात्र, शासनाच्या दप्तरी या सर्व गावांची जी नोंद आहे, त्यांचे इंग्रजी स्पेलिंग आणि मराठी नाव पाहता, बोर्ड लावण्यापूर्वी कुठल्याही विभागाने याची माहिती संबंधितांना दिली नाही का? की बोर्ड लावणाऱ्यांनी याबद्दल विचारणा केली नाही? असे प्रश्न यानिमित्तान उपस्थित होत आहेत. महत्वाचे म्हणजे गेले कित्येक दिवसांपासून लावण्यात आलेल्य या बोर्डवर एकाही ग्रामपंचायतीने कारवाई केली नाही की बोर्ड बदलण्याचे कष्टही घेतले नाहीत. ( Village Name Boards on Jovan to Tung Road Are Wrong Names Misprinted In Marathi and English )
गावाचे खरे नाव आणि समोर लिहिलेले चुकीचे नाव ;
- घारेवस्ती – घारेबस्ती
- शिळींब किंवा शिळीम – शिलिंब
- आजिवली – आजोली
( यांसह अनेक गावांचे इंग्रजीस स्पेलिंग देखील चुकले आहे)
अधिक वाचा –
ग्रामपंचायत काम करेना, शिळींब गावातल्या तरुणांचा निर्धार, ‘एक दिवस गावासाठी, श्रमदानातून विकासासाठी’ उपक्रमाचा शुभारंभ
मावळमध्ये साधेपणाने मात्र उत्साहात बैलपोळा साजरा; शिळींब गावातील बैलांची सजावट ठरली आकर्षणाचा केंद्र