लम्फी स्कीन ( Lumpy skin disease ) या चर्मरोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने शासनाच्या आदेशानुसार मावळ तालुक्यात ( Maval Taluka ) गावोगावी अगदी साधेपणाने परंतू उत्साहात बैल पोळा ( Bail Pola Festival ) हा शेतकऱ्यांसाठी ( Farmer ) दसरा-दिवाळी असलेला सण साजरा झाला. पवनमावळमधील ( Pavan Maval ) शिळींब गावातही ( Shilimb Village ) बळीराजांनी मोठ्या आनंदात बैल पोळ्याचा सण साजरा केला. ( Bail Pola Festival Celebrated With Enthusiasm And Joy )
प्रथा परंपरेप्रमाणे पोळ्याच्या दिवशी बैलांना कोणत्याही प्रकारचे काम लावले जात नाही की, त्यांना नांगराला जुपले जात नाही. आजचा दिवस हा जसा बैलांसाठी आरामाचा तसाच शेतकऱ्यांनी बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. बैलांना आज अंघोळ घालून नंतर त्यांच्या शिंगावर, अंगावर रंगोरंगोटी करण्याची पद्धत आहे. त्यानंतर प्रत्येक शेतकरी त्याच्याकडे असलेल्या सजावटीच्या साहित्यांप्रमाणे बैलांची सजावट करतो. त्यानंतर बैलांना ओवाळले जाते आणि पुरणपोळी खाऊ घातली जाते. त्यानंतर गावातील सर्व बैल एकत्र आणून त्यांची मिरवणूक काढली जाते, अनेकदा झोंबी देखील होते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
परंतू, यंदा शासकीय नियमाप्रमाणे ( Lumpy skin disease Maval Taluka ) शिळींब गावात शेतकऱ्यांनी बैल मिरवणूकीसाठी एकत्र आणणे टाळले. मात्र, बळीराजाने लाडक्या बैलांना सजवण्यात, नटवण्यात आणि त्याला गावदेवाच्या मंदिराभोवती वेढा मारण्याचे चुकवले नाही. शिळींब आणि परिसरात आता प्रत्येक घरात दावण किंवा दावणीला बैलजोडी असल्याचे दिसत नाही. परंतू ज्यांच्याकडे बैलजोडी आहेत असे शेतकरी बैलांना ओवाळून तर ज्यांच्याकडे बैल नाहीत ते मातीचे बैल पुजून बैलपोळा सण साजरा करतात.
हेही वाचा – Video : शेतकऱ्याचा नादखुळा; फायबरच्या का असेना पण बैलांची जंगी मिरवणूक काढलीच! लेझीम, हलगी सर्वकाही
आषाढ, श्रावण किंवा भाद्रपद आणि कार्तिक महिन्याच्या अमावस्येला प्रदेशानुसार बैलपोळा सण साजरा केला जातो. विदर्भ, मराठवाडा भागात श्रावण अमावस्येला बेंदूर साजरा करण्याची परंपरा आहे. कर्नाटक आणि सीमावर्ती गावांतही बेंदूर साजरा करण्याची परंपरा आहे. तथापी श्रावण अमावस्या आणि भाद्रपद अमावस्या या दोन अमावस्या बैलपोळा म्हणून ओळखल्या जातात. मावळ तालुक्यात भाद्रपद अमावस्येला सर्वत्र बैलपोळा सण साजरा केला जातो. ( Lumpy skin disease Maval Taluka Bull Bail Pola Festival Celebrated With Enthusiasm And Joy )
अधिक वाचा –
मावळमध्ये शेतकऱ्याचा कौतुकास्पद उपक्रम! बैल पोळ्याच्या मिरवणूकीचा खर्च टाळून केली मोठी मदत
वडगावच्या जनआक्रोश रॅलीत आदित्य ठाकरेंचे तुफान भाषण! वाचा संपूर्ण भाषण जसेच्या तसे… ‘तरुणांच्या पाठीवर का वार करताय?’