शारदीय नवरात्र ( Shardiya Navratri 2022 ) उत्सवाला सोमवार (26 सप्टेंबर) रोजी घटस्थापनेपासून सुरुवात होत आहे. भारतासह अनेक देशांत नवरात्रोत्सव ( Shardhiya Navaratrotsav ) मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. स्त्री शक्तीचा, आदीशक्तीचा जागर या नऊ दिवसांच्या काळात केला जातो. यासह प्रदेशानुसार विविध प्रथा-परंपरा प्रमाणे नवरात्रीचा काळ ( 9 Day Festival ) साजरा केला जातो. परंतू, सर्वत्रच नवरात्रीचे नऊ दिवस, नऊ वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र परिधान करण्याची पद्धत ( Navratri Colours List ) आहे. ही पद्धत का आहे आणि त्याचे महत्व काय, हे आपण या लेखातून पाहणार आहोत. ( Colours Of Navratri In Marathi )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
नवरात्रोत्सव 2022 – नऊ दिवस, नऊ रंग आणि त्याचे महत्व ( Navratri 2022 Colours )
सोमवार 26 सप्टेंबर 2022 – पहिली माळ, पांढरा रंग (White)
– पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते, तसेच पांढरा रंग शक्ती, शांती, ज्ञान, तपस्या इत्यादींचे प्रतीक आहे.
मंगळवार 27 सप्टेंबर 2022 – दुसरी माळ, लाल रंग (Red)
– दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारीणी देवीची पूजा केली जाते. लाल रंग शांती आणि पवित्रतेचे प्रतीक आहे.
बुधवार 28 सप्टेंबर 2022 – तिसरी माळ, निळा रंग (Royal Blue)
– तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते. निळा रंग साहस, बलिदान व असत्यावर सत्याचा विजयाचे प्रतीक आहे.
गुरुवार 29 सप्टेंबर 2022 – चौथी माळ, पिवळा रंग (Yellow)
चौथ्या दिवशी कृष्मांडा देवीची पूजा केली जाते. पिवळा रंग भक्तांना संतती, समृद्धी, स्नेह आणि मोक्ष चा आशीर्वाद देते.
शुक्रवार 30 सप्टेंबर 2022 – पाचवी माळ, हिरवा रंग (Green)
पाचव्या दिवशी स्कंदमातेची पूजा केली जाते. हिरवा रंग आनंद आणि प्रकाशाचे प्रतिक आहे.
शनिवार 1 ऑक्टोबर 2022 – सहावी माळ, करडा रंग (Grey)
सहाव्या दिवशी कात्यायनी देवीला समर्पित आहे. करडा रंग नवीन सुरुवात आणि विकासाचे प्रतीक आहे. देवी कात्यायनी यांनी महिषासुर राक्षसाचा अंत केला होता.
रविवार 2 ऑक्टोबर 2022 – सातवी माळ, नारिंगी रंग (Orange)
सातव्या दिवशी कालरात्री देवीची पूजा केली जाते. नारंगी रंग बल आणि शक्तीचे प्रतीक आहे.
सोमवार 3 ऑक्टोबर 2022 – आठवी माळ, मोरपिसी (Peacock Green)
आठव्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते. मोरपंखी रंग समृद्धी, नाविण्यता, ऊर्जा, महत्वकांक्षा आणि दृढ विश्वासाचे प्रतीक आहे.
मंगळवार 4 ऑक्टोबर 2022 – नववी माळ, गुलाबी (Pink)
नवव्या दिवशी सिद्धीदात्री देवीची पूजा केली जाते. गुलाबी रंग प्रेम, स्नेह आणि सद्भावाचे प्रतिक आहे.
( Navratri Colours List With Date And Its Significance In Marathi )
अधिक वाचा –
Video : शेतकऱ्याचा नादखुळा; फायबरच्या का असेना पण बैलांची जंगी मिरवणूक काढलीच! लेझीम, हलगी सर्वकाही
मावळमध्ये साधेपणाने मात्र उत्साहात बैलपोळा साजरा; शिळींब गावातील बैलांची सजावट ठरली आकर्षणाचा केंद्र