मुंबईमधील दादर येथील शिवाजी पार्क मैदान ( Shivaji Park Dadar ) म्हणजेच शिवतीर्थावर शिवसेना पक्षाच्या परंपरेनुसार होणारा दसरा मेळावा ( Dussehra Rally ) घेण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) गटाला परवानगी दिली आहे. अगोदर मुंबई महापालिकेने परवानगी नाकारल्यानंतर उद्धव ठाकरे गटाने उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. त्यानंतर आज (शुक्रवार, 23 सप्टेंबर) रोजी न्यायालयात दिर्घकाळ सुनावणी झाली. सर्व पक्षकारांचे म्हणणे ऐकूण घेतल्यानंतर अखेर मुंबई उच्च न्यायालयाने ( Bombay High Court ) शिवसेना उद्धव ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली.
मुंबई उच्च न्यायालयाने हा निकाल देताच संपूर्ण राज्यभर शिवसैनिकांनी आनंदोत्सव साजरा केला. मावळ तालुक्यातही शिवसैनिकांनी एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा केला. वडगाव शहरातील पंचायत समिती चौकात फटाक्यांची आतीषबाजी आणि नारेबाजी करत काही शिवसैनिकांनी निकालाचा आनंद साजरा केला.
ये तो बस झाँकी है… – अमित कुंभार (उप तालुका प्रमुख, शिवसेना मावळ)
‘आमची उद्धव ठाकरे साहेबांची बाजू ही न्यायाची असल्याने न्यायालयाचा निकाल आमच्या बाजूने लागणार याची आम्हाला खात्रीच होती. त्याप्रमाणे आजच्या न्यायालयाच्या या निकालाचे आम्ही स्वागत करतो. यंदाही शिवाजी पार्कवर ठाकरे साहेबांचाच आवाज घुमणार आणि इथूनपुढेही ठाकरेंची शिवसेनाच दसरा मेळावा घेणार’, अशी प्रतिक्रिया शिवसेना मावळ तालुका उप प्रमुख अमित कुंभार यांनी दैनिक मावळ सोबत बोलताना दिली. ( Court Allows Uddhav Thackeray Shiv Sena To Hold Dussehra Rally Celebration By Maval Taluka Shiv Sainiks )
अधिक वाचा –
मोठी बातमी! ठाकरेंनी कोर्टातली लढाई जिंकली, शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला परवानगी, शिंदे गटाला झटका
Video : भव्य जनआक्रोश रॅली, आदित्य ठाकरे वडगावात येणार, आंदोलनाचा जबरदस्त टीझर, एकदा पाहाच
View this post on Instagram