राज्यातील विविध भागात लम्फी स्कीनचा ( Lumpy Skin ) आजार बळावत आहे. गोवंशीय पशूधनाला होणाऱ्या या आजाराने शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे. त्या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यात देखील पशुवैद्यकीय विभागाकडून विविध उपाययोजना करण्यात येत असून गावोगावी पशूधनाचे लम्फीपासून बचाव होण्यासाठी लसीकरण ( Vaccination ) करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर तालुक्यातील वेहेरगाव दहिवली ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील पशूधनाचे मोफत लसीकरण करण्यात आले. ( Free Vaccination By Vehergaon Dahivali Group Gram Panchayat )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
वेहेरगाव-दहिवली ( Vehergaon Dahivali Group Gram Panchayat ) येथे ग्रामपंचायतच्या माध्यमातून घरोघरी जाऊन जनावरांचे लसीकरण करण्यात आले. त्यामुळे वेहेरगाव दहिवली भागातील शेतकरी आणि गोठा मालक यांनी आनंद व्यक्त केला आहे. गावातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची जैविक संपत्ती असलेल्या पशूधनाचे संरक्षण होणे आवश्यक आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या पशूधनाला वाचवण्यासाठी सध्या सर्वच स्तरावरुन जोरदार प्रयत्न होत आहे. दुग्ध उत्पादन आणि शेतीसाठी महत्वाच्या असणाऱ्या या जीवांचे शेतकरी सध्या लसीकरण करुन घेत आहेत. ( Lumpy Skin Free Vaccination Of Animals By Vehergaon Dahivali Group Gram Panchayat )
अधिक वाचा –
लम्फीचा प्रादुर्भाव; आमदार सुनिल शेळकेंचे मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांना ‘हे’ आवाहन
लम्फी आजाराचा प्रादुर्भाव : कार्ला येथे 130 पशुधनाचे प्रतिबंधात्मक लसीकरण