मावळ तालुक्यातील ( Maval Taluka ) मुंडावरे गावाच्या ( Mundhavare Village ) हद्दीत असलेल्या वेट अँड जॉय वॉटरपार्क ( Wet and Joy Water ) येथे स्थानिक तरुणांना नोकरीत सामावून घ्यावे, यासह त्यांच्यावर होणारे अन्याय तत्काळ थांबवावे, या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी ( BJP ) मावळ तालुका यांसह शिवसेना (शिंदे गट), आरपीआय (आठवले गट) महायुतीद्वारे गुरुवार (29 सप्टेंबर) रोजी आंदोलन करण्यात आले होते.
माजी राज्यमंत्री आणि मावळचे माजी आमदार बाळा भेगडे ( Bala Bhegade ) यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी मावळ भाजपचे तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे ( Ravindra Bhegade ) यांसह अनेक पदाधिकारी आणि महायुतीचे कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मुंढावरे येथील वेट अँड जॉय ( WET N JOY ) वॉटर पार्क इथे गेल्या अनेक वर्षांपासून काम करणारे काही स्थानिक कामगार आहेत. या कामगारांसोबत कंपनी प्रशासनाकडून गैरव्यवहार होत असल्याचा त्यांना त्रास दिला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
‘आम्ही कालही कामगारांसोबत होतो, आजही आहोत आणि उद्याही असू’ – रविंद्र भेगडे
‘मुंढावरे येथील येथील वॉटर पार्कच्या हुकूमशाही निर्णय विरोधात लोकसभा प्रवास योजनेचे महाराष्ट्र प्रदेश संयोजक माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मावळ तालुक्यातील स्थानिक तरुणांनाच्या रोजगारासाठी ठिय्या आंदोलन करून स्थानिकांना रोजगार द्यावा, अशी मागणी केली. यावेळी तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते’, असे रविंद्र भेगडे यांनी म्हटले. ( For Local Youth Employment BJP Mahayuti March On Wet and Joy Water Park Mundhavare Village )
अधिक वाचा –
‘वेदांता-फॉक्सकॉन कंपनी सोबत तत्कालीन ठाकरे सरकारचा कोणताही MOU नाही’, महायुतीच्या आंदोलनात खुलासा
पक्षात बाळा भेगडेंचे वजन वाढतंय, आता पुन्हा नवी जबाबदारी! I Bala Bhegade BJP