व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, May 7, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

सांडपाणी नदीत सोडणाऱ्या सोसायट्यांवर गुन्हे दाखल करा ; खासदार श्रीरंग बारणे यांची PMRDA प्रशासनाला सूचना

मावळ मतदारसंघातील PMRDA हद्दीतील विकासकामांचा खासदार बारणे यांच्याकडून आढावा

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 7, 2026
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
MP Barne reviews development works in PMRDA area of ​​Maval constituency

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए)कडून पवना आणि इंद्रायणी नदीपात्रात लगत परवानगी दिलेल्या सोसायट्यांची पाहणी करावी. एसटीपी चालू आहेत की नाही हे तपासावे. थेट नदीत सांडपाणी सोडण्याऱ्या सोसायट्यांवर गुन्हे दाखल करावेत. याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळालाही कळविण्यात यावे. पर्यावरण आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, असा इशारा खासदार श्रीरंग बारणे यांनी दिला.

पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतील मावळ लोकसभा मतदारसंघातील विकास कामांचा खासदार बारणे यांनी गुरुवारी आढावा घेतला. आयुक्त अभिजीत चौधरी अतिरिक्त आयुक्त के. मंजूलक्ष्मी, पोलीस दक्षता अधिकारी अमोल झेंडे, वित्तीय नियंत्रक जितेंद्र कोलंबे, सह आयुक्त रुपाली आवले डंबे, सह आयुक्त पुनम मेहता, हिम्मत खराडे, मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे, मुख्य अभियंता अभियांत्रिकी विभाग शिवप्रसाद बागडी, रिनाज पठाण, उपसंचालक स्मिता कलकुटकी, संचालक विकास परवानगी विभाग अविनाश पाटील तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

खासदार बारणे म्हणाले, मावळ तालुक्यात किल्ले आहेत. त्यामुळे पर्यटकांची संख्या जास्त असते. त्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जाव्यात. लोहगडवरून विसापूरकडे जाणारा रस्ता विकसित करावा. लोहगड पायथ्याशी शिवसृष्टी उभारण्यात यावी. भाजे लेणीपासून लोहगडकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला सुरक्षा कठडे लावावेत. कार्ला फाटा ते मळवली हा रस्ता मंजूर असून त्याचे काम तत्काळ सुरू करावे. देहू ते येलवाडी या तळेगावला जोडणाऱ्या रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. वाहने जाणे कठीण झाले आहे. देहू, भंडारा डोंगर येथे येणाऱ्या वारकऱ्यांची संख्या जास्त असते. या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करावी.

लक्ष्मी चौकातील कोंडी फोडा
भूमकर चौकातून लक्ष्मी रस्त्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. लक्ष्मी चौक – मारुंजी रोड परिसरात अनधिकृत विक्रेत्यांमुळे प्रचंड मोठी वाहतूक कोंडी निर्माण होते. हिंजवडी, वाकडकडून येणाऱ्या वाहनांमुळे लक्ष्मी चौकातील कोंडीत मोठी भर पडते. येथे अतिक्रमणे झाली आहेत. त्यावर कारवाई करून चौक कोंडीमुक्त करावा, अशी सूचना खासदार बारणे यांनी केली.

पवना नदीवरील पुलाचे काम तत्काळ पूर्ण करा
पवना नदीच्या उगमापासून पिंपरी-चिंचवडपर्यंत नदी काठच्या गावाचे सर्वेक्षण करावे. नदी काठच्या गावात एसटीपी उभारावेत. नदी स्वच्छ ठेवण्यासाठी पीएमआरडीएने पुढाकार घ्यावा. किवळे ते सांगवडे दरम्यान पवना नदीवर महापालिका आणि पीएमआरडीएच्या वतीने पूल उभारण्यात येत आहे. महापालिका क्षेत्रातील काम झाले आहे. सांगवडे हद्दीत जागा ताब्यात नाही. त्यामुळे काम रखडले आहे. जागा ताब्यात घेऊन काम मार्गी लावावे, अशी सूचना खासदार बारणे यांनी केली.

तत्कालीन नवनगर विकास प्राधिकरणासाठी जागा दिलेल्या शेतकऱ्यांना शासन निर्णयानुसार तत्काळ परतावा द्यावा. कागदपत्रांमध्ये त्रुटी काढून शेतकऱ्यांना हेलपाटे मारायला लावले जाते. शेतकऱ्यांना तत्काळ सव्वा सहा टक्के परतावा देण्याची सूचना खासदार बारणे यांनी दिल्या.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– कामशेत पोलिसांची कारवाई ! एमडी (मेफेड्रोन) तस्करी करणारे २ आरोपी जेरबंद, २५ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त
– संतापजनक घटना ! पोटच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम पित्यावर लोणावळ्यात गुन्हा दाखल
– देहूरोड आयुध निर्माणी फॅक्टरी परिसरात बिबट्याचा वावर… नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
– राजीनाम्यांची खात्री न करता बरखास्तीचे आदेश… मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीवरील प्रशासक नियुक्तीला स्थगिती


Previous Post

वडगाव शहरातील सर्व उद्याने सुसज्ज व स्वच्छ ठेवा ; भाजपा नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

MP Barne reviews development works in PMRDA area of ​​Maval constituency

सांडपाणी नदीत सोडणाऱ्या सोसायट्यांवर गुन्हे दाखल करा ; खासदार श्रीरंग बारणे यांची PMRDA प्रशासनाला सूचना

May 7, 2026
Keep all parks in Vadgaon city well-maintained and clean BJP corporator Ananta Kude demands

वडगाव शहरातील सर्व उद्याने सुसज्ज व स्वच्छ ठेवा ; भाजपा नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

May 7, 2026
HSC-SSC-Exam

इयत्ता बारावी बोर्डाच्या पुरवणी परीक्षांसाठी १५ मे पर्यंत ऑनलाईन फॉर्म भरण्याचे आवाहन ; ‘लेट फी’सह ‘या’ तारखेपर्यंत फॉर्म भरता येणार

May 7, 2026
Uday Samant

मोठी बातमी ! शासकीय कर्मचाऱ्यांसाठी हिंदी भाषा परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय जाहीर

May 7, 2026
Students will get opportunity to visit NASA and ISRO Maharashtra Govt approves Mukhyamantri Vidyarthi Vigyan Wari initiative

विद्यार्थ्यांना इस्रोसह अमेरिकेतील नासा केंद्राला भेटीची मिळणार संधी ; ‘मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी’ उपक्रमाला शासनाची मान्यता

May 7, 2026
Balasaheb Dalvi elected as Chairman of Kothurne Various Development Cooperative Society in Pawan maval

पवन मावळातील कोथुर्णे विविध विकास सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी बाळासाहेब दळवी यांची बिनविरोध निवड

May 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.