महिलेवर लैंगिक अत्याचार करुन जमीन खरेदी प्रकरणात 66 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांवर गुन्हा दाखल करुन दोन जणांना अटक केली आहे. 10 जुलै 2021 ते 6 जानेवारी 2022 या कालावधीत हा प्रकार घडला. ( Two arrested for sexually assaulting a woman and defrauding )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
एका 33 वर्षीय पीडित महिलेने गुरुवारी (दिनांक 29 सप्टेंबर) रोजी संपूर्ण प्रकरणाबाबत फिर्याद दिली होती. त्यानुसार, प्रदिप फक्कड कोळी (वय 30, रा. तळेगाव दाभाडे), अंकुश सोनवणे, देवा विलास सोनवणे (वय 32, रा. पवनानगर) यांच्यावर देहूरोड पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 376, 406, 420, 120 ब अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, प्रदिप कोळी आणि देवा सोनवणे या दोघांना अटक करण्यात आली आहे.
अधिक वाचा –
सोमाटणे फाट्यावर ‘शोले’चा सीन, महावितरणच्या टॉवरवर चढला तरुण, 50 फूट उंचीवर लोंबकळत राहिला अन्…
BREAKING : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर टँकरला भीषण आग, बचाव कार्य सुरु I Video