Dainik Maval News : तळेगाव दाभाडे शहरातील स्टेशन परिसरातील जोशीवाडी व ठाकरवस्ती येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना 2025-26 अंतर्गत मंजूर झालेल्या निधीतून रस्ता कॉंक्रिटीकरण तसेच बंदिस्त गटार उभारणीच्या कामांचे भूमिपूजन पार पडले.
भूमिपूजन प्रसंगी उपनगराध्यक्ष गणेश काकडे यांनी नागरिकांना विकासकामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याची ग्वाही दिली. वस्तीतील मूलभूत सुविधा सक्षम करणे हेच आमचे प्राधान्य असून, प्रत्येक प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,असे त्यांनी सांगितले.
यावेळी नगराध्यक्ष संतोष दाभाडे (पाटील), मुख्याधिकारी गिरीश दापकेकर, पक्षप्रतोद सत्यम खांडगे, बांधकाम समिती सभापती सुदाम शेळके, आरोग्य समिती सभापती निखिल भगत, शिक्षण समिती सभापती भारतीताई धोत्रे, नगरसेवक शिवाजीराव आगळे, बाबा मुलानी, नगरसेविका सोनालीताई दरेकर, स्नेहाताई खांडगे, मनीषाताई म्हाळसकर, सीयाताई चिमटे, आशाताई भेगडे, कमलताई टकले, ऋतुजाताई भगत आदी मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपनगराध्यक्ष गणेश काकडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या कामांना गती मिळाली आहे. या विकासकामांमुळे परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन अडचणी दूर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून, अनेक दिवस रखडलेल्या प्रश्नांना आता प्रत्यक्षात मार्ग मिळाल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– पवना शिक्षण संकुलात दहावीच्या परीक्षेत मुलींचीच बाजी ; वारु येथील अबोली निंबळे ९६ टक्के गुणांसह केंद्रात व शाळेत प्रथम
– तळेगाव दाभाडे येथील कै. ॲड. कु. शलाका संतोष खांडगे विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा दिल्ली येथे शैक्षणिक दौरा
– इयत्ता बारावी बोर्डाच्या पुरवणी परीक्षांसाठी १५ मे पर्यंत ऑनलाईन फॉर्म भरण्याचे आवाहन ; ‘लेट फी’सह ‘या’ तारखेपर्यंत फॉर्म भरता येणार
– विद्यार्थ्यांना इस्रोसह अमेरिकेतील नासा केंद्राला भेटीची मिळणार संधी ; ‘मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी’ उपक्रमाला शासनाची मान्यता

