मावळ तालुक्यातील मुंडावरे गावच्या हद्दीत असलेल्या वेट अँड जॉय वॉटर पार्क व्यवस्थापनाने तुघलकी निर्णय घेत कंपनीतील कामगारांना कामावरून कमी केले. कंपनी व्यवस्थापनाच्या या निर्णयाविरोधात कामगारांनी कंपनीच्या इथे थेट ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. ( Wet N Joy Water Park Mundhaware Maval )
वेट अँड जॉय वॉटर पार्क व्यवस्थापनाने थेट तीनशे कामगारांना कामावरुन कमी करत वॉटर पार्कला ठाळे ठोकले. कंपनीच्या या तडकाफडकी निर्णयाने 300 कुटुंबांचे भविष्य अधांतरी आले आहे. त्यामुळे या सर्व कामगारांनी कंपनीबाहेरच ठिय्या आंदोलन सुरू केले. ( Wet N Joy Water Park Company Management Lays Off 300 Workers )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
काही दिवसापूर्वी मावळ भाजपाच्या ( Maval BJP ) वतीने 22 कामगार भुमिपुत्रांना कामावरून कमी केल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले होते. तसेच वॉटर पार्क प्रशासनाशी बोलून सदर कामगारांना कामावर परत घेण्याची विनंती केली होती. मात्र वेट अँड जॉय वॉटर पार्क व्यवस्थापनाने याबाबत स्पष्ट नकार दिला. तसेच कामगारांचे आंदोलन फोडण्यासाठी व्यवस्थापनाने काही कामगारांना कामावर घेतले. त्यामुळे इतर संतप्त आंदोलकांनी वॉटर पार्ककडे जाणारे रस्ते जेसीबीने उखडून टाकले.
हेही वाचा – महायुतीचा बेधडक मोर्चा : ‘आम्ही कालही कामगारांसोबत होतो, आजही आहोत आणि उद्याही असू’ – रविंद्र भेगडे
त्यानंतर आता वॉटर पार्क व्यवस्थापनाने देखील कठोर निर्णय घेत वेट ॲंड जॉय वॉटर पार्कलाच टाळे ठोकले आहे. तसेच सर्व कामगारांना कामावरून कमी केले. साधारण हा आकडा तीनशेच्या घरात आहे. त्यामुळे या सर्व कामगारांनी आता वॉटर पार्कच्या बाहेरच ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. ( Wet N Joy Water Park Company Management Lays Off 300 Workers Mundhaware Maval Taluka )
अधिक वाचा –
‘वेदांता-फॉक्सकॉन कंपनी सोबत तत्कालीन ठाकरे सरकारचा कोणताही MOU नाही’, महायुतीच्या आंदोलनात खुलासा
व्हिडिओ: भाजपाकडून कामशेत शहरासाठी नव्या नियुक्त्या, पाहा संपूर्ण यादी