Dainik Maval News : मावळ तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या वतीने तालुक्यातील शेतकरी बांधवांसाठी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर सहकार कृषी सेवा केंद्र सुरू करण्यात आले असून या केंद्राद्वारे इंद्रायणी भात बियाणे व खत विक्री करण्यात येणार असल्याची माहिती संघाचे सभापती किरण हुलावळे, उपसभापती सुनीता केदारी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेस माजी सभापती शिवाजी असवले, संचालक भरत येवले, एकनाथ येवले, बाजीराव वाजे, गणेश विनोदे, शहाजी कडु, विष्णू घरदाळे, प्रमोद दळवी, विठ्ठलराव घारे, आशा खांडभोर, सचिव किरण लोहर उपस्थित होते.
सभापती किरण हुलावळे यांनी सांगितले की खरेदी विक्री सहकारी संघाच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकरी बांधवांना इंद्रायणी भाताचे बियाणे, विविध प्रकारची खते सहज व सुलभ दराने उपलब्ध व्हावी या उद्देशाने सुरू करण्यात येणाऱ्या सहकार कृषी सेवा केंद्राचे उद्घाटन आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते बुधवार दि.३ रोजी दुपारी ३ वाजता करण्यात येणार आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी या सेवा केंद्राचा लाभ घ्यावा असे आवाहन सभापती हुलावळे यांनी केले.
तसेच कामशेत येथील संस्थेच्या जागेमध्ये सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून शेतकरी भवन उभारण्यासाठी प्रयत्न सुरू असून सहकार मंत्री पाटील यांनी यासाठी हिरवा कंदीलही दिलेला आहे. याशिवाय संस्थेच्या वतीने आगामी काळात नागरिक सुविधा केंद्र, पशुखाद्य व औषध विक्री केंद्र अशी विविध दालने सुरू करण्याचा मानस सभापती हुलावळे यांनी यावेळी व्यक्त केला.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– पंचायत समिती शिक्षण विभाग आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस मावळ तालुका यांच्यावतीने दहावी, बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
– पिंपरी-चिंचवडमधील अवैध धंद्यावर कडक कारवाई करा ; खासदार श्रीरंग बारणे यांच्या पोलिसांना सूचना
– भोयरे-सावळा मार्ग बनतोय वेगवान ; सुरक्षिततेसाठी आवश्यक ठिकाणी स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी
– जनगणनेच्या कामासाठी जात असताना शिक्षिकेचा रस्ते अपघातात मृत्यू ; मावळमधील हृदयद्रावक घटना