Dainik Maval News : मावळ तालुका भारतीय जनता पक्षाची मासिक बैठक सोमवारी (दि. १ जून) वडगाव मावळ येथील पक्ष कार्यालयात संपन्न झाली. सध्या शासन स्तरावर चालू असलेल्या जनगणना व घरगणना आणि मतदार यादी पुनर्नरीक्षण कार्यक्रम या विषयावर संघटनात्मक जबाबदारी देऊन चर्चा करण्यात आली.
उठो..जागो, और लक्ष प्राप्ती तक रुको मत ! हा स्वामी विवेकानंद यांनी दिलेला संदेश घेऊन सर्व कार्यकर्त्यांनी काम करावे, येणारा भविष्यकाळ आपल्यासाठी नवी दिशा देणारा आहे, असा उपदेश माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी कार्यकर्त्यांना दिला.
यावेळी गणेश भेगडे, बाबुराव वायकर, सुरेखा जाधव, गुलाबराव म्हाळसकर, शांताराम कदम आदी पदाधिकाऱ्यांसह लोणावळा, तळेगाव, वडगाव मंडळ अध्यक्ष आणि इतर पदाधिकारी, महिला भगिनी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठक संपन्न झाल्यानंतर मावळ-मुळशीचे प्रांताधिकारी सुरेंद्र नवले, मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांच्याकडे तालुक्यातील शेतकरी व सर्वसामान्य नागरिक यांच्या कामासंदर्भात तहसील कार्यालयात विशेष बैठक घेऊन, प्रलंबित प्रश्न लवकर मार्गी लावावेत, अशी मागणी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी केली.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– पंचायत समिती शिक्षण विभाग आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस मावळ तालुका यांच्यावतीने दहावी, बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
– पिंपरी-चिंचवडमधील अवैध धंद्यावर कडक कारवाई करा ; खासदार श्रीरंग बारणे यांच्या पोलिसांना सूचना
– भोयरे-सावळा मार्ग बनतोय वेगवान ; सुरक्षिततेसाठी आवश्यक ठिकाणी स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी
– जनगणनेच्या कामासाठी जात असताना शिक्षिकेचा रस्ते अपघातात मृत्यू ; मावळमधील हृदयद्रावक घटना