भारतीय शिक्षण मंत्रालयाच्या इनोवेशन सेल आणि भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘राष्ट्रीय स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2022’ स्पर्धेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड रिसर्च महाविद्यालयातील (पीसीसीओईआर) दोन संघाने प्रथम क्रमांक मिळवून विजेतेपद पटकावले. दोन्ही संघाचा एआयसीटीईने एक लाख रुपये बक्षिस आणि प्रमाणपत्र देवून गौरव केला. ( Great Success Of Pimpri Chinchwad College Of Engineering )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
नमक्कल तमिळनाडू येथे झालेल्या स्पर्धेत पीसीसीओईआरच्या ‘सुगम शिक्षा’ या संघाने सॉफ्टवेअर एडिशन मध्ये अंतिम फेरीत नेहा भेगडे हिच्या नेतृत्वाखाली अथर्व निंबाळकर, अभिषेक खाचणे, ओम चिमणपुरे, रितिका भोईटे आणि आदित्य बिले यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तर कोल्हापूर येथे झालेल्या स्पर्धेत ‘8 बीट’ या संघाने सॉफ्टवेअर एडिशन मध्ये अंतिम फेरीत टीम लीडर आगम बोथरा याच्या नेतृत्वाखाली सिद्धी शितोळे, प्रकाश शर्मा, धैर्यशील मेश्राम, अभिजीत जाधव आणि विश्वतेज सरवळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. ( Smart India Hackathon competition 2022 )
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, प्राचार्य डॉ. हरीश तिवारी यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. स्पर्धेचे समन्वयक म्हणून प्रा. अच्युत खरे आणि प्रा. जमीर कोतवाल यांनी काम केले. प्रा. सोनाली लुनावत, प्रा.निलेश कोरडे, अभिजीत देवगिरीकर, संगणक विभाग प्रमुख प्रा. डॉ. अर्चना चौगुले यांनी मार्गदर्शन केले. ( Great Success Of Pimpri Chinchwad College Of Engineering In Smart India Hackathon competition 2022 )
अधिक वाचा –
‘बँकेचे ग्राहक हेच बँकेचे मालक’, पवना सहकारी बँकेच्या वर्धापनदिनी नवीन मुख्य कार्यालय इमारतीचे उद्घाटन
मावळ तालुक्यातील सावित्रीच्या लेकींची शिक्षणासाठीची पायपीट थांबावी यासाठी मोठी मदत!