पंचायत समिती मावळ ( Panchayat Samiti Maval ) व मावळ डेव्हलपमेंट फाउंडेशन ( Maval Development Foundation ) यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय गुणवंत शिक्षक ( Meritorious Teacher ) व उपक्रमशील शाळा पुरस्कार ( Enterprising School Award ) वितरण सोहळा 2022-23 वडगाव मावळ ( Vadgaon ) येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाला मावळ तालुक्याचे आमदार सुनिल शेळके ( MLA Sunil Shelke ) यांसह पुणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद हे प्रमुख उपस्थित होते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
‘शिक्षकांच्या कार्याचा गौरव व्हावा, हाच उदात्त दृष्टिकोन पुरस्कार देण्यामागे असून ज्ञानदानाच्या कार्यासोबतच शाळेचे नाव उज्वल व्हावे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी तळमळीने काम करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान होणे देखील गरजेचे आहे. भावी पिढी घडविण्यासाठी अनेक नवी आव्हाने येत आहेत. मात्र मावळ तालुक्यातील शिक्षक या आव्हानांना सामोरे जात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित आहेत, याचा मला नक्कीच अभिमान आहे. शाळांमधील भौतिक सुविधा, वर्ग खोल्या सुधारणा, स्मार्ट क्लास यासारख्या गोष्टींसाठी निधी उपलब्ध करुन देण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील आहे. शाळांमधील पटसंख्या कमी होणार नाही, यासाठी सर्व शिक्षकांनी शाळेतील गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रयोगशील राहिले पाहिजे’, असे मनोगत आमदार शेळकेंनी यावेळी व्यक्त केले. ( Meritorious Teacher and Enterprising School Award MLA Sunil Shelke )
हेही वाचा – भडवली शाळेतील आदर्श शिक्षक ज्ञानेश्वर शिवणेकर यांना मावळ पंचायत समितीचा आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कार
हेही वाचा – आदर्श शिक्षक मारुती ठोंबरे यांच्या प्रयत्नातून तुंग शाळेला पंचायत समितीचा ‘उपक्रमशील शाळा पुरस्कार’
कार्यक्रमाला आमदार शेळके, आयुष प्रसाद यांसह जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी श्रीमती संध्या गायकवाड, विस्तार अधिकारी निलिमा म्हेत्रे, गटविकास अधिकारी सुधीर भागवत, सहाय्यक गट विकास अधिकारी प्रताप पाटील, गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे, विस्तार अधिकारी सुदाम वाळुंज, जिल्हा नियोजन समिती सदस्य विठ्ठलराव शिंदे, माजी कार्याध्यक्ष दिपक हुलावळे, संजय गांधी समिती अध्यक्ष नारायणराव ठाकर, सभापती नंदकुमार धनवे, देवाभाऊ गायकवाड, जेष्ठ नागरिक सेल अध्यक्ष वि.म.शिंदे, सरपंच विजय सातकर, नामदेव शेलार, प्रकाश पवार, काळुराम वाडेकर, राष्ट्रवादी महिला काँग्रेस तालुकाध्यक्षा दिपाली गराडे, माजी पंचायत समिती सभापती निकीता घोटकुले, ज्योती शिंदे, सुवर्णा कुंभार, माजी नगरसेविका संगिता शेळके, सुनिता गवळी, कुलस्वामिनी महिला मंच अध्यक्षा सारिका शेळके, अदिका तनपुरेआदि मान्यवर, पदाधिकारी तसेच सर्व केंद्रप्रमुख, शिक्षक वृंद उपस्थित होते. ( Panchayat Samiti Maval Development Foundation Meritorious Teacher and Enterprising School Award Vadgaon MLA Sunil Shelke )
अधिक वाचा –
मावळ राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलची कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न, ‘या’ महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा
मावळमध्ये साधेपणाने मात्र उत्साहात बैलपोळा साजरा; शिळींब गावातील बैलांची सजावट ठरली आकर्षणाचा केंद्र
अखेर यादी आलीच…! जिल्हानिहाय पालकमंत्र्यांची यादी जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा, पाहा पुण्याचे पालकमंत्री कोण?