मावळ तालुका ( Maval Taluka ) पंचायत समितीच्या ( Panchayat Samiti ) वतीने दरवर्षी तालुकास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार आणि उपक्रमशील शाळा पुरस्कार ( Enterprising School Award ) देण्यात येतात. यंदाचा हा पुरस्कार प्रदान सोहळा शनिवार (24 सप्टेंबर) रोजी वडगाव येथे संपन्न झाला. मावळ तालुक्याचे आमदार सुनिल शेळके ( MLA Sunil Shelke ) पुणे जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला. यावेळी भडवली शाळेतील आदर्श शिक्षक ज्ञानेश्वर किसन शिवणेकर यांना तालुकास्तरीय आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला. ( Dnyaneshwar Shivnekar Received Meritorious Teacher Award )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
ज्ञानेश्वर किसन शिवणेकर ( Dnyaneshwar Shivnekar ) हे सध्या मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भडवली ( Zilla Parishad Primary School Bhadvali ) येथे कार्यरत आहेत. मागील 18 वर्षांपासून ते प्रामाणिकपणे ज्ञानदानाचे कार्य करत आहेत. एक उपक्रमशील आणि प्रयोगशील शिक्षक म्हणून परिसरात ते परिचित आहेत. त्यांच्या पुढाकाराने भडवली ( Bhadvali ) शाळेने आजवर प्रगतीचे अनेक टप्पे ओलांडलेत. विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि प्रयोगशील शिक्षण यातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी ते नेहमीच प्रयत्न करतात. विद्यार्थ्यांचे लाडके शिक्षक असलेले ज्ञानेश्वर शिवणेकर यांच्या प्रामाणिक अध्यापन कार्याची पोचपावती म्हणजे हा मिळालेला पुरस्कार आहे.
हेही वाचा – श्री ज्ञानेश्वर विद्या निकेतनचे आदर्श शिक्षक गणेश पाटील यांच्यावर शिक्षक परिषदेकडून मोठी जबाबदारी!
ज्ञानेश्वर किसन शिवणेकर यांना यंदाचा तालुकास्तरीय आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कार सन 2022-23 प्राप्त झालाय. आमदार सुनिल शेळके, पुणे जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, गटविकास अधिकारी सुधीर भागवत, गटशिक्षण अधिकारी बाळासाहेब राक्षे या मान्यवरांच्या हस्ते ज्ञानेश्वर शिवणेकर यांनी हा पुरस्कार स्विकारला. ( Dnyaneshwar Shivnekar Zilla Parishad Primary School Bhadvali Received Maval Panchayat Samiti Meritorious Teacher Award )
अधिक वाचा –
नव्या जबाबदारीबद्दल ज्येष्ठ अध्यापक, आदर्श शिक्षक भाऊसाहेब खोसे यांचा खास सन्मान
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मावळ तालुका नुतन कार्यकारिणी जाहीर, पाहा यादी