महाराष्ट्रात त्यातही मावळ तालुक्यातील ( Maval Taluka ) तळेगाव ( Talegaon ) येथील नियोजित वेदांता-फॉक्सकॉन यांचा प्रकल्प गुजरात ( Vedanta Foxconn Project To Gujarat ) राज्यात हलवण्यात आला आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र संताप व्यक्त केला जात असून शनिवारी (24 सप्टेंबर) वडगाव ( Vadgaon ) येथे शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे ( Aaditya Thackeray ) यांच्या नेतृत्वात भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. मात्र, आता भाजपा-शिवसेना-आरपीआय मावळ यांच्याकडून नव्या आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
वेदांता फॉक्सकॉन ( Vedanta Foxconn ) कंपनी स्थलांतरित संदर्भात महाराष्ट्रातील आणि मावळच्या जनतेची दिशाभूल करण्याचे काम महावसुलीआघाडी (महाविकास आघाडी) ( Maha Vikas Aghadi ) घटक पक्ष करत असल्याचा आरोप करत, याच्या निषेधार्थ वडगाव येथे भाजपाकडून निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
हेही वाचा – मावळ तालुक्यात होणारा प्रकल्प गुजरातला गेला; राज ठाकरे भडकले, म्हणाले ‘उलटा प्रवास सुरु’

निषेध मोर्चाची माहिती खालीलप्रमाणे;
प्रमुख उपस्थिती –
या मोर्चासाठी महाराष्ट्र प्रदेश भाजपाचे प्रवक्ते आमदार राम कदम, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, आरपीआय पश्चिम महाराष्ट्रचे अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, पुणे जिल्हा भाजपाचे अध्यक्ष गणेश भेगडे, खासदार श्रीरंग आप्पा बारणे, तालुका अध्यक्ष रविंद्र भेगडे, शिवसेना तालुका प्रमुख राजु खांडभोर, आरपीआय तालुका अध्यक्ष नारायण भालेराव आदी जण उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती वडगाव शहर भाजपाचे अध्यक्ष अनंता कुडे आणि तालुका सरचिटणीस सुनिल चव्हाण यांनी दिली.
दिनांक, वेळ, स्थळ –
वार – सोमवार, दिनांक 26 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 10.30 वाजता
स्थळ – पोटोबा महाराज मंदिर, वडगाव
( Bharatiya Janata Party Maval Protest March Against Maha Vikas Aghadi at Vadgaon )
अधिक वाचा –
व्हिडिओ : ‘अजूनही वेळ गेलेली नाही’, आमदार सुनिल शेळके यांचे निषेध मोर्चात दमदार भाषण
वडगावच्या जनआक्रोश रॅलीत आदित्य ठाकरेंचे तुफान भाषण! वाचा संपूर्ण भाषण जसेच्या तसे… ‘तरुणांच्या पाठीवर का वार करताय?’