मावळ तालुक्यातील ( Maval Taluka ) तळेगावजवळ ( Talegaon ) होणारा वेदांता समूह आणि फॉक्सकॉन कंपनी यांचा प्रकल्प आता गुजरात ( Gujrath ) राज्यात हलवण्यात आला आहे. त्यामुळे तालुक्यातील जनतेसाठी हा सर्वात मोठा धक्का असून या प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या लाखो नोकऱ्या यासह प्रकल्पामुळे उभे राहणारे छोटे पूरक उद्योग, शेकडो कोटींचा कर महसूल याला मुकावे लागणार आहे.
मावळच्या भुमिपुत्रांचा नोकरीचा हक्काचा घास यामुळे हिरावून घेण्यात आला असून आमदार सुनिल शेळके ( MLA Sunil Shelke ) यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस ( NCP Maval ) पक्षाने गुरुवारी मावळमधील वडगाव तहसील कार्यालयावर भव्य निषेध मोर्चा काढला होता. या मोर्चात आमदार सुनिल शेळके यांनी दमदार भाषण करत अनेक विषयांवर रोखठोक भाष्य केले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
फॉक्सकॉन-वेदांताचा सेमीकंडक्टर बनवण्याचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरात राज्यात हलवण्यात आला आहे. या प्रकल्पाची एकूण गुंतवणूक 1 लाख 58 हजार कोटींची आहे. हा प्रकल्प मावळ तालुक्यात तळेगाव येथे होणार होता. प्रचंड रोजगारनिर्मितीची क्षमता असणारा हा प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ( Nationalist Congress Party March On Maval Tehsil Office MLA Sunil Shelke Speech video )
अधिक वाचा –
Vedanta Foxconn Project : ‘मावळची सुज्ञ जनता हे कधीही विसरणार नाही’ : आमदार शेळके
आमदार शेळकेंच्या प्रयत्नांमुळे मावळकरांचे स्वप्न होणार पुर्ण; तालुक्यात लवकरच ‘ही’ यंत्रणा उभारणार