व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, October 7, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

गुडन्यूज! येत्या 12 ऑगस्टला होणार पुण्याच्या चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे लोकार्पण, चंद्रकांत पाटलांची माहिती

पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतीच चांदणी चौकातील उड्डाणपूल प्रकल्पाच्या कामाला भेट देऊन पाहणी केली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
July 16, 2023
in पुणे, ग्रामीण, शहर
Chandani-Chowk-Pune

Photo Courtesy : FB / ddipune


पुण्याचे ( Pune ) पालकमंत्री चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil ) यांनी नुकतीच चांदणी चौकातील ( Chandani Chowk ) उड्डाणपूल ( Flyover ) प्रकल्पाच्या कामाला भेट देऊन पाहणी केली. उड्डाणपूल प्रकल्पाचे उर्वरित काम गतीने पूर्ण करावे आणि उद्घाटन कार्यक्रमाचे योग्य नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी प्रकल्प संचालक संजय कदम, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, माजी नगरसेवक किरण दगडे पाटील, दीपक पोटे, अमोल बालवडकर, माजी नगरसेविका अल्पना वर्पे, आदी उपस्थित होते.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून पुण्यातील चांदणी चौकात उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुला प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून येत्या 12 ऑगस्ट रोजी केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण करण्याचे नियोजित आहे. या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाच्या पूर्वतयारीच्यादृष्टीने चंद्रकांत पाटील यांनी चांदणी चौक येथे भेट दिली. ( Pune Guardian Minister Chandrakant Patil Visited And Inspected Work Progress Of Flyover Project At Chandani Chowk )

पुण्यातील चांदणी चौकातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून चांदणी चौकात उड्डाणपूल, सेवा रस्ता उभारण्यात येत असून, सध्या या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. लवकरच सर्व काम पूर्ण करण्याचे नियोजन असल्याची माहिती प्रकल्प संचालक संजय कदम यांनी यावेळी पालकमंत्र्यांना दिली.

पुणेकरांसाठी चांदणी चौक हा अतिशय महत्वाचा आहे. त्यामुळे त्याचे उर्वरित काम जलदगतीने पूर्ण करावे. त्यासोबतच कामात कोणतीही त्रुटी राहू नये, याची खबरदारी घ्यावी. पावसाची शक्यता लक्षात घेऊन उद्घाटन कार्यक्रमाचे नियोजन करावे, अशा सूचना यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

अधिक वाचा –
– बालविवाह प्रकरणी पतीला अटक, मावळमधील धक्कादायक घटना! अल्पवयीन पत्नी 5 महिन्यांची गरोदर झाल्यानंतर प्रकार उघड
– मावळ तालुक्याला हादरवणाऱ्या ‘शिरगाव सरपंच हत्या’ प्रकरणी मोठी अपडेट! ‘त्या’ तीनही आरोपींची कोर्टाकडून निर्दोष मुक्तता


dainik maval jahirat

Previous Post

म्हाडा आणि सिडकोत घरासाठी अर्ज करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा! केंद्र सरकारकडून उत्पन्नाच्या मर्यादेत मोठी वाढ

Next Post

इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल आणि गुणवत्ता यादी जाहीर, ‘असा’ चेक करा निकाल

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Pune-Scholarship-Exam

इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल आणि गुणवत्ता यादी जाहीर, 'असा' चेक करा निकाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Shocking murder behind death of Abhay Marathe in Lonavala Grandfather himself killed his grandson

लोणावळ्यातील ‘त्या’ अपघाती मृत्यूमागे थरारक हत्याकांड! आजोबानीच नातवाला संपवलं… पोलिसांकडून मोठा खुलासा

October 6, 2026
Traffic police take action against two-wheelers with fancy number plates in Lonavala

लोणावळ्यात फॅन्सी नंबरप्लेट असणाऱ्या दुचाकी, कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट वाहनावंर वाहतूक पोलिसांची कारवाई

October 6, 2026
Accidental gunshot while cleaning rifle Tragic death of former councilor son in Lonavala

रायफल साफ करताना अचानक गोळी सुटली… लोणावळ्यात माजी नगरसेवकाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

October 5, 2026
new garbage collection vehicles septic tank cleaning vehicle inaugurated by Vadgaon Nagar Panchayat

वडगावकरांच्या सेवेत 6 नवीन घंटागाड्या आणि 1 सेप्टिक टँक गाडी दाखल ; नगरपंचायतीकडून लोकार्पण

October 5, 2026
ST Bus Image

‘आवडेल तेथे कोठेही प्रवास पास’, आता ऑनलाइन एसटीचा प्रवास अधिक सुलभ

October 5, 2026
Rain plays truant heat rises Kharif crops in Maval taluka at risk farmers face double crisis

पावसाची दडी, उष्णतेत वाढ… मावळातील खरीप पिके धोक्यात ; बळीराजावर दुहेरी संकट

October 5, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.