संपूर्ण मावळ तालुक्याला हादरवणाऱ्या शिरगाव सरपंच हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या हत्या प्रकरणात पोलिसांनी सुरुवातीला अटक केलेल्या तीनही आरोपींची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे.
शिरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच प्रवीण साहेबराव गोपाळे यांची याच वर्षी एप्रिल महिन्यात (दिनांक 1 एप्रिल) शिरगावच्या साईबाबा मंदिरासमोरील चौकात धारदार शस्त्राने वार करत निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्येने संपूर्ण तालुक्यात खळबळ माजली होती. ( Shirgaon Sarpanch Praveen Gopale Murder Case Update Maval Taluka )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
हत्येनंतर पोलिसांनी प्राथमिक तपासात, महेश पोपट भेगडे (वय 41, रा. तेली आळी, तळेगाव दाभाडे ता. मावळ), अशोक लक्ष्मण कांबळे (वय 53, रा. कांब्रे नामा ता. मावळ), मनेश देवराम ओव्हाळ (वय 42, रा. जांभूळ ता. मावळ) यांना अटक केली होती. या तिघांचीही आता पुराव्याअभावी खुनात सहभाग नसल्याचे सांगत कोर्टाने निर्दोष मुक्तता (दिनांक 21 जून 2023) केली.
तसेच सदर हत्येप्रकरणात, 1) अमोल आप्पासाहेब गोपाळे (वय 38, रा. डॅफोडील सोसायटी सोमाटणे फाटा ता. मावळ), 2) विशाल उर्फ किरण सुनील गायकवाड (वय 25), 3) संदीप उर्फ आण्णा छगन गोपाळे (वय 31) आणि 4) ऋतिक शिवाजी गोपाळे (वय 22), तिघे रा. शिरगाव ता. मावळ ) हे आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. तर, निखिल दिलीप बालवडकर (रा. बालेवाडी पुणे), अमर प्रकाश ओझरकर (रा. माण मुळशी पुणे) व सागर राहुल ओव्हाळ (रा. बालेवाडी जि. पुणे मूळ केम ता. करमाळा जि. पुणे) हे आरोपी अद्याप फरार आहेत.
शिरगाव-परंदवडी पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, शिरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच प्रवीण गोपाळे यांचा राजकीय वादातून धारदार शस्त्राने खून करण्यात आला होता. ही घटना शनिवारी (दिनांक 1 एप्रिल 2023) रोजी रात्री 9:30 च्या सुमारास साई बाबा मंदिराच्याप्रवेशद्वारा समोरच घडली होती. पोलिसांनी प्राथमिक तपासात महेश भेगडे, अशोक कांबळे, मनेश ओव्हाळ यांना अटक करुन न्यायालयीन कोठडीत रवाना केले होते. परंतू, सदर हत्येच्या गुन्ह्याच्या तपासात महेश भेगडे, मनेश ओव्हाळ आणि लक्ष्मण कांबळे यांचा सहभाग नसल्याचे निष्पन्न झाल्याने न्यायालयाने आता तिघांचीही निर्दोष मुक्तता केलीये.
अधिक वाचा –
– राज्य मंत्रिमंडळाचे फेरबदलासह खातेवाटप जाहीर! अजितदादांनी बाजी मारली, कुणाच्या वाट्याला कोणतं खातं? लगेच वाचा
– मावळात सापांची संख्या अधिक, सर्पदंश झाल्यास काय करावे? वन्यजीव रक्षक मावळकडून कामगारांमध्ये जनजागृती
– ‘माझं वडगाव माझं व्हिजन’ अभियानाद्वारे मनसेने जाणून घेतली तज्ञांची मते; शहराच्या विकासासाठी बनवणार ‘ब्लूप्रिंट’!