इर्शाळवाडी (जि. रायगड) दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे प्रमुख नेते तथा महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदा (दि. 22 जुलै) वाढदिवस साजरा न करता कार्यकर्त्यांनी आपदग्रस्तांना मदतीचे आवाहन केले होते. ह्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी मावळ तालुका यांच्या वतीने देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस “सेवा दिवस” म्हणून साजरा करण्यात आला. ( On Occasion of Devendra Fadnavis Birthday Maval Taluka BJP Distributed School Materials To Needy Students )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
त्यानिमित्ताने वडगाव शहरातील गोपाळराव देशपांडे वनवासी वसतिगृहातील मुलांना भाजपाचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे-पाटील, मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, वडगाव शहर अध्यक्ष अनंता कुडे ह्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शालेय साहित्य आणि फळांचे वाटप करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
त्याचप्रमाणे लोणावळा इथे देखील भारतीय जनता पार्टी लोणावळा शहराच्या वतीने अंतर भारती बालग्राम येथील विद्यार्थ्यांना माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव आणि माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी ह्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शालेय साहित्य आणि खाऊ वाटप करून देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस “सेवादिवस” म्हणून साजरा केला गेला.
महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आमचे नेते @Dev_Fadnavis साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मावळ विधानसभा मतदार संघात भारतीय जनता पार्टीच्या वतीने वडगाव आणि लोणावळा येथे शालेय साहित्य आणि फळे वाटप करून मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा वाढदिवस "सेवादिवस" म्हणून साजरा केला! pic.twitter.com/oBLB9nXhc4
— Ravindra Bhegade ( Modi Ka Pariwar ) (@BhegadeRavindra) July 22, 2023
यावेळी लोणावळा शहर अध्यक्ष रामविलास खंडेलवाल, माजी नगरसेवक ललित सिसोदिया, लोणावळा शहर सरचिटणीस अमित गंद्येय, महिला आघाडी अध्यक्षा योगिता कोकरे, अर्जुन पाठारे, युवक अध्यक्ष शुभम मानकामे, अरुण लाड, हर्षल होगले, नंदू जोशी आदींसह महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
अधिक वाचा –
– मोहितेवाडी इथे चर्चासत्राद्वारे शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती । Maval Agriculture
– ‘या वर्षी मी वाढदिवस साजरा करणार नाही’, कार्यकर्त्यांनाही आवाहन; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केला निर्णय