व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, March 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळ्यात चोरीच्या घटनेतील आरोपी 12 तासात गजाआड; शहर पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई

फिर्यादीच्या घरात घुसूनआरोपींनी त्यांना आणि वडीलांना चाकूचा धाक दाखवत मारहाण केली आणि घऱातील मुद्देमाल चोरी केला होता.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
July 23, 2023
in पुणे, ग्रामीण, लोकल, शहर
crime-arrested

File Photo


लोणावळा शहरातील परमार हॉस्पिटलजवळ लक्ष्मी निवास बिल्डिंगमध्ये गुरुवारी (दिनांक 20 जुलै) पहाटेच्या सुमारास घडलेल्या चोरीच्या घटनेतील आरोपींना पोलिसांनी अवघ्या 12 तासात गजाआड केले आहे. यश धर्मेश कांबळे (वय 20, रा. लिमुनीगुंज बुद्धविहार, खडकी, पुणे), शकील कासीम शेख याच्यासह अल्पवयीन आरोपी मुलगा यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी चिराग जुन्नरकर यांनी लोणावळा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

फिर्यादी सांगितल्याप्रमाणे, चिराग जुन्नरकर यांच्या घरात घुसून आरोपींनी त्याला आणि त्याच्या वडिलांना चाकूचा धाक दाखवत मारहाण केली. घराच्या हॉलमधील साउंड सिस्टम, मोबाईल व रोख रक्कम असे एकूण 36 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल घेऊन चोरटे पसार झाले होते. ( Lonavala Police And Local Crime Branch Arrested Accused In Crime Of Theft Within 12 Hours )

लोणावळा शहर पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखा ह्यांच्या पथकाने संयुक्त कारवाई करत यश कांबळे, शकील शेख व अल्पवयीन मुलगा यांना ताब्यात घेतले. चौकशी केली असता त्यांनी केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली असून आरोपींना लोणावळा शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे व लोणावळा उपविभागीय सहायक पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार अब्दुल मुजावर, सहायक फौजदार प्रकाश वाघमारे, कर्मचारी बाळासाहेब खडके, हेमंत विरोळे, प्राण येवले, हनुमंत शिंदे, तानाजी गोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

अधिक वाचा –
– उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वडगावात मोरया प्रतिष्ठानकडून रेनकोट आणि पावसाळी बूटचे वाटप
– ‘वारु – ब्राम्हणोली ग्रुप ग्रामपंचायत’ सरपंचपदी हरिभाऊ निंबळे बिनविरोध । Gram Panchayat Election


Previous Post

स्तुत्य उपक्रम! बेबडओहळ गावात भद्राय राजते प्रतिष्ठानकडून औषधी वनस्पतींची लागवड

Next Post

व्वाह पोराहो…शाब्बास!! शिष्यवृत्ती परीक्षेच्या जिल्हा गुणवत्ता यादीत भोयरे शाळेतील तीन विद्यार्थ्यांचा समावेश

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Scholarship-Exam-Result

व्वाह पोराहो...शाब्बास!! शिष्यवृत्ती परीक्षेच्या जिल्हा गुणवत्ता यादीत भोयरे शाळेतील तीन विद्यार्थ्यांचा समावेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी

February 28, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

February 28, 2026
Knowledge on Wheels bus providing science lessons will reach villages in Pavan Maval

पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण

February 27, 2026
Accident

Talegaon Accident : तळेगाव-चाकण मार्गावर टेम्पोखाली चिरडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.