लोणावळा शहर आणि परिसरात मागील आठवड्याभरापासून पावसाचा जोर कायम आहे. जोरदार पावसामुळे शहरातील नाले तुडूंब भरुन वाहत आहेत, तर त्याचवेळी शहराच्या जवळपास असणारी धरणे – तलाव देखील भरत आली आहेत. टाटा पॉवरच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणावळा धरण परिसरात गेल्या 24 तासात 122 मीमी पावसाची नोंद झाली असून या कालावधीत 1.75 दलघमी आवकाची नोंद झाली आहे.
आज (दिनांक 25 जुलै) रोजी सकाळी 7 वाजता लोणावळा धरणाबाबत हि सुचना देण्यात आली आहे. त्यानुसार सततच्या पावसाने पाण्याची आवक प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. मंगळवारी (दिनांक 25 जुलै) सकाळी धरणातील जलाशय साठा हा 9.89 दलघमी अर्थात 84.38 टक्के इतका झाला होता. सध्या धरणात उपलब्ध margin/pocket 1.83 दलघमी इतका आहे. ( Increased in water storage in Lonavala Dam due to heavy rains advised citizens to be alert )
या पार्श्वभूमीवर धरण अभियंत्यांकडून नागरिकांना सावध करण्यात आले आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास धरणातील पाणीसाठा लवकर वाढू शकतो. ह्याचाच अर्थ धरण पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून इंद्रायणी नदी पात्रात विसर्ग सूरू करावा लागू शकतो. ही दाट शक्यता लक्षात घेता प्रशासनाकडून नागरिकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.
इंद्रायणी नदीपात्रात पाणी सोडल्यास आसपासच्या गावातील नागरिक आणि पर्यटक, सामान्य नागरिक यांनी सावध रहावे आणि सध्या कुणीही नदी पात्रालगत किंवा नदीपात्रात उतरु नये, अशा सतर्कतेच्या सुचना नागरिकांना देण्यात आल्या आहेत. प्रशासनानेही अलर्ट राहाण्याबाबत आवाहन केले आहे. बसवराज मुन्नोळी (टाटा पॉवर) यांनी ही महिती दिली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– मणिपूर महिला अत्याचार घटनेवर मावळ तालुक्यात काँग्रेस आक्रमक, थेट तहसील कार्यालयावर काढला मोर्चा आणि…
– एकाच महिन्यात रस्त्यांची चाळण, लोणावळ्यात मनसे आणि भाजपचा मोर्चा, आंदोलनासाठी निवडली हटके स्टाईल