व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, September 22, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

राज्य शासनाने अर्थसंकल्पात केलेल्या भरीव तरतुदीनंतर पुणे-लोणावळा लोहमार्गाच्या तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकला रेल्वे मंत्रालयाने गती देण्याची मागणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकसाठी 5100 कोटी रुपयांची तरतूद

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 14, 2026
in ग्रामीण, देश-विदेश, पुणे, महाराष्ट्र, शहर
Demand to speed up third and fourth tracks of Pune-Lonavala railway after substantial provisions in budget

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच सादर केलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकसाठी 5100 कोटी रुपयांची तरतूद केल्यानंतर मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. राज्य शासनाने निधीची तरतूद केल्याने आता रेल्वे मंत्रालयाने ट्रॅक निर्माणाच्या कामाला गती देण्याची मागणी खासदार बारणे यांनी केली.

दिल्लीत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची खासदार बारणे यांनी भेट घेतली. पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसरा आणि चौथ्या ट्रॅकचा गरज त्यांना समजावू सांगितली. यावेळी छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे उपस्थित होते.

खासदार बारणे म्हणाले, पुणे ते लोणावळा दरम्यान उपनगरीय रेल्वे सेवा सुरु आहे. याचा दररोज एक ते सव्वा लाख प्रवासी लाभ घेतात. या मार्गावर दोन ट्रॅकवरच रेल्वे धावतात. त्यामुळे या मार्गावर रेल्वे गाड्यांची संख्या वाढविणे शक्य नाही. सन २०१७ मध्ये पुणे ते लोणावळा लोहमार्गावर तिसरा आणि चौथ्या ट्रॅक करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्याला मान्यता देण्यात आली.

रेल्वे विभागाने सर्वेक्षणही पूर्ण केले आहे. ट्रॅकसाठी आवश्यक जागाही रेल्वे विभागाकडे आहे. राज्य सरकारकडून निधी मिळत नसल्याने ट्रॅकच्या कामाला अद्यापपर्यंत सुरुवात झाली नाही. रेल्वे मंत्री वैष्णव यांनीही या प्रस्तावित ट्रॅकची पाहणी केली होती. निधी देण्याच्या सूचना राज्याच्या सचिवांना दिल्या होत्या. या ट्रॅकसाठी राज्य सरकार ५० टक्के आणि केंद्र सरकारची ५० टक्के हिस्सेदारी निश्चित आहे.

महायुती सरकारच्या दुसऱ्या अर्थसंकल्पात पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकसाठी 5100 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे आता रेल्वे मंत्रालयाने ट्रॅक निर्माणाच्या कामाला गती द्यावी अशी मागणी खासदार बारणे यांनी केली. त्याला रेल्वेमंत्री वैष्णव यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. राज्य सरकारने निधीची तरतूद केल्याने आता केंद्र सरकार तातडीने पाऊले उचलेल अशी ग्वाही वैष्णव यांनी दिल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– महाराष्ट्राचे २२ वे राज्यपाल म्हणून जिष्णू देव वर्मा यांनी घेतली शपथ ; राजघराण्यातील व्यक्ती, कवी – लेखक अन् राजकारणी, जाणून घ्या नवीन राज्यपालांबद्दल
– ESMA Act : मोठी बातमी ! घरगुती गॅस सिलिंडर बुकिंगबाबत नियम बदलले , देशभरात ‘एस्मा’ लागू
– मोठी बातमी ! राज्यात 9 मार्चपासून नवीन ऑटो रिक्षांना परवाना देण्यास स्थगिती
– मावळ पंचायत समिती सभापती पदी सुनीता येवले आणि उपसभापती पदी साहेबराव कारके यांची बिनविरोध निवड 


dainik maval jahirat

Previous Post

गुडन्यूज ! प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा २२ वा हप्ता वितरित, महाराष्ट्रातील ९१ लाख शेतकऱ्यांना १ हजार ८३७ कोटींचे वितरण

Next Post

ज्या गावांमध्ये स्मशानभूमीसाठी जागा नाही, तिथे विशेष मोहीम राबवून जागा उपलब्ध करून देण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Yewalewadi village in Maval taluka without cemetery smashan bhumi funeral has to be held in open

ज्या गावांमध्ये स्मशानभूमीसाठी जागा नाही, तिथे विशेष मोहीम राबवून जागा उपलब्ध करून देण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Directives issued for an SIT inquiry into Ketan Agarwal murder case at Lohagad Fort in Maval

केतन अगरवाल खून प्रकरणात पाच हजार पानी आरोपपत्र ; ग्रामीण पोलिसांकडून वडगाव मावळ न्यायालयात आरोपपत्र दाखल

September 21, 2026
Traditional Leki Magne game celebrated in Pawan Maval after ganesh utsav

पवन मावळात ‘लेकी मागण्याचा’ पारंपरिक खेळ उत्साहात ; फुगड्या, गाणी अन् विनोदी लग्नसोहळ्याने रंगत

September 21, 2026
450 players participate in Maval Taluka inter school chess tournament at Blooming International School Gahunje

गहुंजे येथील ब्लूमिंग इंटरनॅशनल स्कूल येथे मावळ तालुका आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेत ४५० खेळाडूंचा सहभाग

September 21, 2026
Ganesh Mandals in Vadgaon city cancel immersion processions against backdrop of tragic incidents

दुःखद घटनांच्या पार्श्वभूमीवर वडगाव शहरात गणेश मंडळांकडून विसर्जन मिरवणुका रद्द ; साधेपणाने बाप्पाला निरोप

September 21, 2026
Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.