व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, September 20, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

महाराष्ट्राचे २२ वे राज्यपाल म्हणून जिष्णू देव वर्मा यांनी घेतली शपथ ; राजघराण्यातील व्यक्ती, कवी – लेखक अन् राजकारणी, जाणून घ्या नवीन राज्यपालांबद्दल

शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 10, 2026
in देश-विदेश, महाराष्ट्र
Jishnu Dev Verma takes oath as 22nd Governor of Maharashtra Know about new Governor

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी राज्यपाल पदाची शपथ घेतली. लोकभवनातील दरबार सभागृह येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी त्यांना राज्यपालपदाची शपथ दिली.

शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. जिष्णू देव वर्मा हे महाराष्ट्राचे २२ वे राज्यपाल आहेत.

सुरुवातीला मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी जिष्णू देव वर्मा यांच्या नियुक्तीसंदर्भातील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढलेली अधिसूचना वाचून दाखवली. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत व राज्यगीताने झाली तर सांगता राष्ट्रगीताने झाली. शपथविधी नंतर राज्यपालांना भारतीय नौदलातर्फे मानवंदना देण्यात आली.

शपथविधी सोहळ्याला विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, अन्न व औषध प्रशासन नरहरी झिरवळ, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, पोलीस महासंचालक सदानंद दाते, पोलीस आयुक्त देवेन भारती, मुख्य राज्य शिष्टाचार अधिकारी राजेश गवांदे व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा परिचय :
महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा हे त्रिपुराच्या माणिक्य राजघराण्यातून आलेले एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहेत. माणिक्य राजघराणे हे भारतातील सर्वात प्राचीन राजघराण्यांपैकी एक असून ते प्रगत विचारसरणीसाठी ओळखले जाते. या राजघराण्याने १९४१ मध्ये त्रिपुरासाठी पहिली लिखित राज्यघटना लागू केली होती. नागरिकांमध्ये स्वावलंबन, सहकार्य आणि राज्यनिष्ठा यासारख्या मूल्यांना प्रोत्साहन देणे हे राज्यघटनेचे उद्देश होते. या राज्यघटनेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे अल्पसंख्याक, मागासवर्गीय आणि कामगारांसाठी विधानसभेत जागांचे आरक्षण देण्यात आले होते. देशभरात आरक्षणाची संकल्पना रुजण्यापूर्वीच त्रिपुराच्या प्रगती आणि समृद्धीसाठी आधुनिक विचारांचा अवलंब करण्यात आला होता.

राजघराण्याची पार्श्वभूमी असूनही जिष्णु देव वर्मा अत्यंत विनम्र, सहज उपलब्ध आणि सर्व स्तरांतील लोकांशी संवाद साधण्यास उत्सुक असलेले व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी १९९३ मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश करून आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केली आणि त्रिपुराचे राष्ट्रीय परिषदेचे सदस्य म्हणून निवडून आले. त्यांनी त्रिपुरा प्रदेश भाजपचे सरचिटणीस म्हणूनही कार्य केले आणि पक्षाच्या संघटनात्मक कामकाजाची जबाबदारी सांभाळली.

२०१८ मध्ये त्यांनी १९ चारिलाम (अनुसूचित जमाती) विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि तब्बल ८९.३३ टक्के मते मिळवत अभूतपूर्व विजय मिळवला.

२०१८ मध्ये त्रिपुरात २५ वर्षांच्या डाव्या आघाडीच्या कारकिर्दीनंतर भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेत आले आणि जिष्णू देव वर्मा यांनी उपमुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. या काळात त्यांनी वित्त, ग्रामीण विकास आणि ऊर्जा यांसारख्या महत्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळली.

आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध प्रकल्पांची अंमलबजावणी, आर्थिक संसाधनांची उपलब्धता आणि ठरलेल्या वेळेत कामे पूर्ण करण्यावर विशेष भर दिला.

त्रिपुरामध्ये यशस्वीपणे राबविण्यात आलेला बायो व्हिलेज 2.0 हा त्यांचा एक अभिनव उपक्रम आहे. कृषी, ऊर्जा आणि उपजीविकेच्या क्षेत्रात पर्यावरणपूरक पद्धतींचा अवलंब करून ग्रामीण भागात शाश्वत विकासाला चालना देणे हा या उपक्रमाचा उद्देश होता.

समुदायाच्या सक्रिय सहभागावर आधारित या उपक्रमामुळे स्थानिक शेतकरी आणि कुटुंबांनी हरित तंत्रज्ञान व शाश्वत पद्धती स्वीकारल्या. त्यामुळे शाश्वत ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात त्रिपुराने अग्रस्थान मिळवले. पुढे या उपक्रमाला आंतरराष्ट्रीय स्तरावरही उत्कृष्ट उपक्रम म्हणून मान्यता मिळाली.

ईशान्य भारताच्या विकासासाठी धोरण निर्मितीमध्ये जिष्णू देव वर्मा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. १९८९ ते १९९३ या काळात ते नॉर्थ ईस्टर्न कौन्सिलच्या सल्लागार समितीचे प्रमुख सदस्य होते. त्यांनी इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेजच्या त्रिपुरा विभागाचे संयोजक म्हणून कार्य केले आणि ईशान्य भारतातील उपक्रमांचे समन्वयक म्हणून केले.

अनेक कलागुणांनी संपन्न असलेले जिष्णु देव वर्मा यांना आधुनिक कला, चित्रकला आणि शिल्पकलेची विशेष आवड आहे. त्यांच्या सर्जनशील कलाकृतींमध्ये विविध कलागुणांची अभिव्यक्ती दिसून येते. संस्कार भारतीच्या सहकार्याने त्यांच्या अनेक कलाकृती विविध पर्यटनस्थळे, मंदिरे आणि सार्वजनिक ठिकाणी मांडण्यात आल्या आहेत.

ते एक प्रख्यात कवी आणि लेखकही आहेत. बंगाली आणि इंग्रजी भाषेतील त्यांच्या कवितांनी अनेकांच्या मनाला स्पर्श केला आहे. त्यांच्या Children of Water Goddess आणि Master of Time या पुस्तकांमधील साहित्यिक अभिव्यक्ती प्रभावी आणि भावस्पर्शी मानली जाते.

आदिवासी विकास, शिक्षण, आरोग्य तसेच कला आणि संस्कृती यांप्रती त्यांची अत्यंत निष्ठा आणि बांधिलकी आहे.

३१ जुलै २०२४ रोजी जिष्णू देव वर्मा यांची तेलंगणाचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर १० मार्च २०२६ रोजी त्यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची शपथ घेतली.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– ESMA Act : मोठी बातमी ! घरगुती गॅस सिलिंडर बुकिंगबाबत नियम बदलले , देशभरात ‘एस्मा’ लागू
– मोठी बातमी ! राज्यात 9 मार्चपासून नवीन ऑटो रिक्षांना परवाना देण्यास स्थगिती
– मावळ पंचायत समिती सभापती पदी सुनीता येवले आणि उपसभापती पदी साहेबराव कारके यांची बिनविरोध निवड


dainik maval jahirat

Previous Post

मोठी बातमी ! राज्यात 9 मार्चपासून नवीन ऑटो रिक्षांना परवाना देण्यास स्थगिती

Next Post

मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अत्याधुनिक सुविधायुक्त नूतन कार्यालयाचे उद्घाटन

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Inauguration of new office with state-of-the-art facilities of Maval Taluka Agricultural Produce Market Committee

मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अत्याधुनिक सुविधायुक्त नूतन कार्यालयाचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
Former Minister of State Madan Bafna passes away Funeral held with state honors

‘मावळचे भाग्यविधाते’ माजी मंत्री मदन बाफना यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

September 16, 2026
Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.