मावळ तालुक्यात परंदवडी इथे वन विभागाच्या जागेत तब्बल 8000 झाडांची लागवड करण्यात आली. महाराष्ट्र शासन पुणे वनविभाग, पुणे रोटरी क्लब ऑफ मावळ व काव्या करिअर ॲकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आठ हजार देशी झाडांचे रोपण करण्यात आले. जुलै महिना हा रोटरी मावळच्या माध्यमातून वृक्ष लागवड व संवर्धन महिना म्हणून साजरा केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर चालू महिन्यातील हा वृक्षारोपणाचा तिसरा मोठा प्रकल्प रोटरी मावळच्या माध्यमातून राबवण्यात आला. ( Plantation of 8000 trees here in Parndavadi Maval Taluka )
ह्या प्रकल्पासाठी वन विभाग व काव्या करिअर ॲकॅडमीचे सहकार्य लाभले. वडगाव मावळचे वनपरिक्षेत्र अधिकारी हनुमंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या प्रकल्पासाठी वन अधिकारी एम. एस हिरेमठ, वनपाल परमेश्वर कासुळे, वनरक्षक योगेश कोकाटे, रोटरी मावळचे अध्यक्ष सुनील पवार, रेश्मा फडतरे, नीलेश गराडे, दीपक चव्हाण, पुनम देसाई, मयूर गायकवाड, काव्या करिअर ॲकॅडमीचे संस्थापक शंकर हुरसाळे व ॲकॅडमीचे शंभर प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
पावसाच्या संततधारेत काव्या करिअर अकॅडमीच्या प्रशिक्षणार्थींचा वृक्षारोपणाचा उत्साह दांडगा होता. वनविभागातर्फे एम. एस. हिरेमठ यांनी याप्रसंगी उपस्थित प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. तर रोटरी मावळच्या वतीने रो सुनील पवार आणि रो रेश्मा फडतरे यांनी मनोगत व्यक्त केले. रो. निलेश गराडे यांनी भविष्यात आपत्तीजन्य परिस्थिती उद्भवल्यास वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या वतीने या प्रशिक्षणार्थींकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली. शंकर हुरसाळे यांनी उपस्थितांचे आभार मानले व प्रशिक्षणार्थींकडून समाजाला लागेल ती मदत करण्याची ग्वाही दिली. ( Plantation of 8000 trees here in Parndavadi Maval Taluka )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– ‘मोहरम’च्या पार्श्वभूमीवर तळेगाव दाभाडे पोलिसांकडून शहरात रुट मार्च, जाणून घ्या मोहरम बद्दल
– पक्क्या लायसन्ससाठी मावळ तालुक्यात ‘या’ दिवशी आरटीओकडून मेळाव्याचे आयोजन, पाहा तारीख आणि ठिकाण
– हॅन्ड इन हॅन्ड इंडिया संस्थेकडून मोई गावातील महिलांना आर्थिक उन्नतीसाठी मेहंदी प्रशिक्षण । Pune News