पवनानगर – सेवानिवृत्ती हा सेवेचा पूर्णविराम नसुन नवीन ध्येय प्राप्त करण्याचा शुभारंभ असतो असे मत नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे यांनी पवनानगर येथे व्यक्त केले. पवना शिक्षण संकुलातील पवना विद्या मंदिर पवनानगर पर्यवेक्षिका निला केसकर व प्रयोशाळा परिचर दादू वाघे यांचा कार्यपूर्ती गौरव सोहळा पवनानगर येथे संपन्न झाला यावेळी खांडगे अध्यक्षपदावरुन बोलत होते.
यावेळी पुढे बोलताना खांडगे म्हणाले की, सौ.केसकर यांनी शैक्षणिक क्षेत्रात ३४ वर्षे ज्ञानदानाचे काम केले त्यापैकी सर्वात जास्त सेवा पवनानगर येथे १७ वर्षे शाळेत कार्यरत होत्या. आता पवना विद्या मंदिर या शाळेतून पर्यवेक्षक पदावरून सेवानिवृत्त होत आहे या कार्यकालात प्रशासन कसे करावे याचा आदर्श घेण्यासारखे आहे. अनेकदा मुख्याध्यापक होण्याची व बदली मिळण्याची संधी मिळाली होती परंतु मला प्रमोशनही नको आणि बदली नको अशा म्हणणाऱ्या एकमेव केसकर मॅडम होत्या. ( Pavana Education Complex Pavana Vidya Mandir teacher farewell ceremony in presence of Santosh Khandge )
यावेळी कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव संतोष खांडगे, संस्थेचे सचालक सोनबा गोपाळे, महेशभाई शहा, विनायक अभ्यंकर, प्रल्हाद कालेकर, माजी मुख्याध्यापिका विद्या गांधी, प्राचार्य भाऊसाहेब आगळमे, सिमा गावडे, दशरथ ढमढेरे, बबन तांबे, सुदाम वाळुंज महादेव थोरात, कैलास पारधी, संजय वंजारे, वासंती काळोखे, राम कदमबांडे, बलभीम भालेराव, अनिता लादे, कमल ढमढेरे, केंद्रप्रमुख पांडुरंग डेंगळे, माजी विद्यार्थी सतीश मोरे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना केसकर म्हणाल्या की, पवनानगर शाळेत मला इतके प्रेम मिळाले व अशक्य गोष्टी आपल्या सहवासात शक्य होत गेल्या मोठ्या मनाची माणसे मला क्षणोक्षणी मिळत गेली व आपल्या प्रेमाच्या नात्याने माझे विश्व वाढत गेले असे. यावेळी संस्थेचे संचालक गोपाळे गुरुजी, महेशभाई शहा, विनायक अभ्यंकर यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
सेवानिवृत्त होणारे सौ. केसकर व श्री. वाघे यांना सन्मानचिन्ह, मानपत्र व पोषाख देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी सर्वात जास्त सेवा पवना विद्या मंदिर पवनानगर या शाळेत झाल्याने शाळेच्या सुरु असलेल्या माजी विद्यार्थी सभागृहासाठी पर्यवेक्षिका निला केसकर यांनी ५१ हजार रूपयांचा धनादेश दिला तर ज्या शाळेत शिकलो त्याच शाळेत सेवानिवृत्त झालो यासाठी माजी विद्यार्थी सभागृहासाठी श्री. दादू वाघे यांनी २१ हजार रुपयांचा धनादेश दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य भाऊसाहेब आगळमे यांनी केले सूत्रसंचालन पूनम दुश्मन, भारत काळे यांनी केले तर आभार शिक्षक प्रतिनिधी अमोल जाधव यांनी मानले. ( Pavana Education Complex Pavana Vidya Mandir teacher farewell ceremony in presence of Santosh Khandge )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– ‘मोहरम’च्या पार्श्वभूमीवर तळेगाव दाभाडे पोलिसांकडून शहरात रुट मार्च, जाणून घ्या मोहरम बद्दल
– पक्क्या लायसन्ससाठी मावळ तालुक्यात ‘या’ दिवशी आरटीओकडून मेळाव्याचे आयोजन, पाहा तारीख आणि ठिकाण
– हॅन्ड इन हॅन्ड इंडिया संस्थेकडून मोई गावातील महिलांना आर्थिक उन्नतीसाठी मेहंदी प्रशिक्षण । Pune News