वडगाव मावळ : मागील पाच वर्षांपूर्वी वडगाव ग्रामपंचायत बरखास्त झाल्यानंतर वडगाव नगरपंचायत स्थापन होऊन ती अस्तित्वात आली. तदनंतर वडगाव शहराच्या सर्वांगीण व भविष्यातील गरजांचा विचार करून वडगाव नगरपंचायतीचा नवीन विकास आराखडा करण्याचे काम सुरू करण्यात आले, सदरचा विकास आराखडा संबंधित एजन्सीने गावाची गरज ओळखून दळणवळण व इतर आवश्यक भविष्यातील बाबींचा विचार करून तो तयार केला. सदरचा विकास आराखडा तयार झाल्यानंतर तो दिनांक 19 जुन 2023 रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये ठेवण्यात आला आणि फक्त नगरसेकांनी त्याची माहिती देऊन तो कुठेही प्रदर्शीत करण्यात आलेला नाही. ( Scheduled DP of Vadgaon Nagar Panchayat BJP demand to announce plan for public information )
वडगाव शहर भाजपाने मध्यंतरी मुख्याधिकारी प्रविण निकम यांना तोंडी माहिती विचारली असता, झालेल्या नगरसेवकांच्या मिटिंग नंतर एक महिन्याने जाहीर करू असे तोंडी आश्वासन दिले. परंतु सदरचा विकास आराखडा सर्वसाधारण सभेमध्ये ठेवून एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी होऊन गेला आहे, तरी देखील वडगाव शहरातील नागरिकांसाठी विकास आराखडा पाहण्यासाठी जाहीर होतं नाही, यामागे सत्ताधारी यांचे काही बंद दारा आड गौड बंगाल चालू आहे काय असा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण झाला आहे.
विकास आराखडा हा वडगाव मधील शेतकरी बंधू आणि नागरिकांसाठी असून तो जाहीर होत नाही म्हणजे त्यामध्ये सत्ताधारी आणि बिल्डर लॉबी यांच्या काही अर्थपूर्ण तडजोडीकरिता तो प्रलंबित आहे काय? अशी शंका वडगावकर जनतेच्या वतीने भाजपा शहर अध्यक्ष अनंता कुडे यांनी मुख्याधिकारी यांना विचारणा केली आहे, असे एक ना एक अनेक प्रश्न वडगांव मधील सर्व सामान्य जनतेच्या मनात निर्माण होत आहेत. तरी वडगांव नगरपंचायतीचा नियोजित विकास आराखडा त्वरित जाहीर करण्यात यावा. अन्यथा वडगाव शहर भाजपाला तीव्र स्वरूपाचा आंदोलनाचा मार्ग स्विकारावा लागेल. असा इशारा निवेदनातून देण्यात आला.
यावेळीनगर पंचायत मुख्याधिकारी प्रविण निकम यांना निवेदन देताना मा सभापती गुलाबराब म्हाळसकर, भाजपा शहराअध्यक्ष अनंता कुडे, विरोधीपक्षनेत्या अर्चना म्हाळसकर, युवा मोर्चा अध्यक्ष विनायक भेगडे, नगरसेवक रविंद्र म्हाळसकर, खंडूशेठ भिलारे,भाजपा उपाध्यक्ष शरद मोरे, हरिष दानवे आदि जण उपस्थित होते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– ‘मोहरम’च्या पार्श्वभूमीवर तळेगाव दाभाडे पोलिसांकडून शहरात रुट मार्च, जाणून घ्या मोहरम बद्दल
– पक्क्या लायसन्ससाठी मावळ तालुक्यात ‘या’ दिवशी आरटीओकडून मेळाव्याचे आयोजन, पाहा तारीख आणि ठिकाण
– हॅन्ड इन हॅन्ड इंडिया संस्थेकडून मोई गावातील महिलांना आर्थिक उन्नतीसाठी मेहंदी प्रशिक्षण । Pune News