व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, August 6, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कामशेत पोलिसांकडून गावठी बंदूक व जिवंत काडतुसांसह एकाला अटक, गोठ्यात लपवली होती बंदूक, वाचा सविस्तर

नमुद आरोपीविरोधात कामशेत पोलिस स्टेशन इथे भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
July 29, 2023
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल
kamshet-police-maval

Photo Courtesy : Kamshet Police


कामशेत पोलीस स्टेशन इथे नव्याने रूजू झालेले पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील यांनी कामशेत पोलीस स्टेशनचा चार्ज घेतल्यापासुनच गुन्हेगारांविरोधात धडाकेबाज कारवाया सुरू केल्या आहेत. त्याचाच भाग म्हणुन अवैध धंद्यांविरोधात कारवाया, रोड पेट्रोलिंग, सतर्क नाकाबंदी, पाहिजे व फरार आरोपींचा शोध घेणे इ. प्रकारे पोलिस निरिक्षक रविंद्र पाटील यांनी गुन्हेगारांना वचक बसविला आहे. ( Kamshet police arrested one accused with village gun and live cartridge )

त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी (दिनांक २८ जुलै २०२३) रोजी कामशेत पोलिस स्टेशन हद्दीमध्ये एका व्यक्तीकडे अग्निशस्त्र हत्यार व जिवंत राऊंड असल्याबाबतची खात्रीशीर बातमी पोलिस निरिक्षक पाटील यांनी मिळाली होती. त्यानुसार कामशेत पोलिस स्टेशनचे पो.नि. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने लागलीच सापळा रचला. केलेल्या कारवाईत आरोपी रमेश सुरेश मानकर (वय ३३ वर्ष, रा. वेल्हवळी, ता. मावळ, जि. पुणे सध्या रा. इंद्रायणी कॉलनी, कामशेत, ता. मावळ, जि. पुणे) याने मौजे नाणे गावच्या हद्दीत एका घराच्या गोठ्यात लपवून ठेवलेले एक सिंगल बोअरची गावठी बंदूक व त्यासोबत एकुण 3 जिवंत काडतुसे (राऊंड) पंचांसमक्ष काढून दिल्याने ते जप्त करण्यात आले.

नमुद आरोपीविरोधात कामशेत पोलिस स्टेशन इथे भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सफौ शेख करत आहेत. सदरचा संवेदनशील प्रकार कामशेत पोलीस स्टेशनचे पथकाने उघडकीस आणून आरोपींना जेरबंद केले आहे. सदर कारवाई पोलीस अधिक्षक अंकीत गोयल, अप्पर पोलीस अधिक्षक मितेश घट्टे, उपविभागीय अधिकारी लोणावळा विभाग सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली कामशेत पोलीस स्टेशनचे पो. नि. पाटील, पोसई चव्हाण, सफौ शेख, पो. हवा तावरे, पो.ना सातपुते, पो. ना. विरणक, पो. शि राऊळ यांचे पथकाने केली आहे. ( Kamshet police arrested one accused with village gun and live cartridge )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– ‘मोहरम’च्या पार्श्वभूमीवर तळेगाव दाभाडे पोलिसांकडून शहरात रुट मार्च, जाणून घ्या मोहरम बद्दल
– पक्क्या लायसन्ससाठी मावळ तालुक्यात ‘या’ दिवशी आरटीओकडून मेळाव्याचे आयोजन, पाहा तारीख आणि ठिकाण
– हॅन्ड इन हॅन्ड इंडिया संस्थेकडून मोई गावातील महिलांना आर्थिक उन्नतीसाठी मेहंदी प्रशिक्षण । Pune News


dainik maval jahirat

Previous Post

‘वडगाव नगरपंचायतीचा नियोजित डी.पी. प्लॅन जनतेच्या माहितीसाठी लवकर जाहीर करा, अन्यथा…’ शहर भाजपचा इशारा

Next Post

बेकायदा पार्किंग ते चौकाचौकात सीसीटीव्हीची गरज; मनसे शिष्टमंडळाने घेतली नवनियुक्त पोलिस निरीक्षकांची भेट । Vadgaon Maval

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
mns-vadgaon-maval

बेकायदा पार्किंग ते चौकाचौकात सीसीटीव्हीची गरज; मनसे शिष्टमंडळाने घेतली नवनियुक्त पोलिस निरीक्षकांची भेट । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Shiv Sena takes an aggressive stance on Pimpri-Chinchwad water cut issue Pavana Dam is 100 pecent full

पिंपरी-चिंचवड पाणीकपात प्रकरणी शिवसेना आक्रमक ; पवना धरण १०० टक्के भरले तरी १५ टक्के पाणी कपात का?

August 4, 2026
MLA Sunil Shelke urgent meeting held to resolve issue regarding Gevhande crematorium

आमदार सुनील शेळके यांनी पाळला शब्द ; गेव्हंडे स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तातडीची बैठक

August 4, 2026
Marathi Journalist Sangh Maval Taluka New Executive Committee announced

मराठी पत्रकार संघ मावळ तालुका नूतन कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी वाडेकर, कार्याध्यक्षपदी पवार, सचिवपदी विनोदे – पाहा संपूर्ण कार्यकारिणी

August 4, 2026
MLA Sunil Shelke efforts land transferred to talegaon nagarparishad for Andhra Dam water project

आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नांना यश ; आंध्रा धरण पाणी प्रकल्पासाठी साडेतीन एकर जागा नगरपरिषदेला हस्तांतरित

August 4, 2026
ISO Rating of Zilla Parishad Schools in Mundhavare Valak Wadiwale village in maval taluka

मुंढावरे, वळक, वाडीवळे येथील जिल्हा परिषद शाळांना आयएसओ मानांकन

August 4, 2026
Cyber ​​security and anti-drug awareness campaign by Vadgaon Maval Police

Vadgaon Maval : वडगाव मावळ पोलिसांकडून सायबर सुरक्षा आणि अंमली पदार्थविरोधी जनजागृती

August 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.