मावळ तालुक्यात क्रीडा संकुल उभारण्याच्या कामांसंदर्भात संयुक्त आढावा बैठकीचे आयोजन करण्यात यावे, याबाबतचे निवेदन मावळचे आमदार सुनिल शेळके (sunil shelke) यांनी राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे (Sanjay Bansode) यांना आज (बुधवार, दिनांक 9 ऑगस्ट) रोजी दिले. ( sports complex Maval Taluka MLA Sunil Shelke met Minister Sanjay Bansode )
‘मावळ तालुक्यातून अनेक युवा खेळाडुंनी विविध क्रीडा प्रकारात चमकदार कामगिरी करत नावलौकिक मिळवला आहे. क्रीडा क्षेत्रातील कौशल्य असुनही केवळ अद्ययावत व सुसज्ज क्रिडासंकुल नसल्यामुळे उदयोन्मुख खेळांडुना अनेक अडचणी येत आहेत. मावळ तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी जागा उपलब्ध करुन अद्ययावत आणि सुसज्ज क्रीडा संकुल उभे राहिल्यास खेळाडूंना आवश्यक त्या सुविधा मिळून आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू तयार होतील,” अशी प्रतिक्रिया आमदार सुनिल शेळके यांनी माध्यमांना दिली.
तसेच, ‘मागील तीन वर्षांपासून यासाठी पाठपुरावा करुनही अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. मावळ तालुक्यात क्रिडा संकुल उभारणे कामा संदर्भात मंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या संयुक्त आढावा बैठकीचे आयोजन व्हावे अशी विनंती केली’ असल्याचे शेळकेंनी सांगितले. तसेच, यावर लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात येईल असे आश्वासन मंत्री बनसोडे यांनी दिल्याचेही त्यांनी सांगितले. ( sports complex Maval Taluka MLA Sunil Shelke met Minister Sanjay Bansode )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– आमदार सुनिल शेळकेंनी शब्द पाळला आणि तब्बल 45 वर्षांनंतर उजळला खंडोबाचा माळ
– पुणे जिल्ह्यात 9 ऑगस्ट रोजी सर्व शासकीय कार्यालयात घेतली जाणार पंचप्रण शपथ, काय आहे अभियान? जाणून घ्या
– लोणावळ्यात उतरले म्हणून टोलची रक्कम वाढली कशी? मराठी अभिनेत्रीने केली मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील टोलची ‘पोलखोल’