पुणे शहर आणि जिल्हावासीयांसाठी अत्यंत महत्वाचा असणारा पुण्यातील चांदणी चौक येथील विकास कामाचे आज (12 ऑगस्ट) लोकार्पण होणार आहे. पुण्याच्या चांदणी चौक उड्डाणपुलाच्या उद्घाटनाला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. परंतू, ज्यांनी हा प्रकल्प लवकर पूर्ण व्हावा यासाठी मेहनत घेतली ते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कार्यक्रमाला येणार नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळेच एकनाथ शिंदे हे नाराज आहेत का? अशी चर्चा सध्या सुरु आहे. ( Chief Minister Eknath Shinde Absent For Inauguration Of Pune Chandni Chowk Flyover Programme )
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कालपासून त्यांच्या सातारा जिल्ह्यातील दरे या गावी मुक्कामी आहेत. खरे तर उड्डाणपूलाच्या उदघाटन सोहळ्याला मुख्यमंत्री प्रमुख अतिथी होते. त्यामुळे त्यांनी आज सकाळीच हेलिकॉप्टरने निघणे अपेक्षित होते. परंतू मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या आजच्या कार्यक्रमात अचानक बदल केला असून ते आजही साताऱ्यातच राहणार, अशी माहिती समोर येत आहे. एकंदरीत प्रत्येक विकासकामे आणि कार्यक्रम यांना आवर्जून उपस्थित राहणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज पुण्यातील या महत्वाच्या कार्यक्रमाला येणार नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे, आणि या चर्चा आहेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज आहेत का?
उपमुख्यमंत्री अजित पवार ह्यांना याबाबत विचारले असता त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची तब्येत नादुरुस्त असल्याचे सांगितले. परंतू अजित (दादा) पवार यांच्या सरकारमधील एन्ट्रीने एकनाथ (भाई) शिंदे हे अस्वस्थ असल्याची चर्चाच सध्या राजकीय वर्तूळात सर्वाधिक होत आहे. यातील सत्यता काय ते लवकरच जनतेपुढे येईल, अशी आशा आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच दहा महिन्यांपूर्वी चांदणी चौकातील वाहतूक कोंडीचा फटका बसला होता. ते साताऱ्याकडे जात असताना वाहतूक कोंडीत अडकले होते. यावेळी पुणेकरांनी ही समस्या त्यांच्याकडे मांडली होती. मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर पुलाचे काम करण्याचे आदेश दिले होते. परंतु आता तेच समारंभाला येणार नसल्याचे वृत्त आहे. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी पुलाचे उद्घाटन करणार आहेत. आज सकाळी 11 वाजता हा समारंभ होणार आहे. उद्घाटनाची सगळी तयारी पूर्ण झाली आहे. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार ,पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आदी मान्यवर राहणार सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. ( Chief Minister Eknath Shinde Absent For Inauguration Of Pune Chandni Chowk Flyover Programme )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– शाब्बास पोरांनो..! पवना शिक्षण संकुलातील विद्यार्थ्यांचे नाट्यछटा स्पर्धेत घवघवीत यश, आता थेट जिल्हा पातळीवर भिडणार
– सह्याद्री फाउंडेशन आयोजित दहीहंडी उत्सव 2023 अध्यक्षपदी सुनिता कुडे तर कार्याध्यक्षपदी ‘यांची’ निवड । Vadgaon Maval
– पवन मावळमधील ‘या’ रस्त्याच्या कामाचा भूमिपूजन समारंभ संपन्न; नागरिकांची त्रासापासून सुटका होणार