व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, August 30, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत पुणे विभागस्तरीय पुरस्कार जाहीर; बनवडी ग्रामपंचायत प्रथम

स्वच्छतेशी आणि ग्रामविकासाशी निगडीत क्षेत्रामध्ये भरीव काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाच्या माध्यमातून तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर पुरस्कार देण्यात येतात.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
August 12, 2023
in पुणे, ग्रामीण, महाराष्ट्र
gadgebaba-gram-swachhta-abhiyan

Photo Courtesy : Team Dainik Maval


स्वच्छतेच्या सवयी अंगीकारुन ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्यमान, जीवनस्तर उंचावण्याच्या उद्देशाने राज्य शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत सन 2020-21 व 2021-22 या दोन वर्षाचे विभागस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. सातारा जिल्ह्यातील बनवडी (ता.कराड) ग्रामपंचायतीला प्रथम पुरस्कार जाहीर करण्यात आला असल्याची माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे. ( pune divisional level award announced under sant gadgebaba gram swachhta abhiyan )

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत विभागीय आयुक्त राव यांच्या अध्यक्षतेखालील विभागस्तरीय समितीने नुकतीच विभागातील पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हास्तरावर प्रथम व द्वितीय क्रमांक मिळालेल्या ग्रामपंचायतींची तपासणी केली. या समितीमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता राजेंद्र राहणे, पुणे विभागाचे माहिती उपसंचालक डॉ. पुरुषोत्तम पाटोदकर, विकास शाखेच्या सहाय्यक आयुक्त सोनाली घुले आणि विकास शाखेचे उपायुक्त विजय मुळीक यांचा समावेश होता.

समितीने केलेल्या पडताळणीनुसार विभागस्तरीय पारितोषिकासाठी पुढीलप्रमाणे ग्रामपंचायती पात्र ठरल्या आहेत –

सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यातील बनवडी ग्रामपंचायतीला विभागस्तरीय प्रथम पुरस्कार जाहीर झाला असून बक्षीसाची रक्कम रुपये दहा लाख आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आजरा तालुक्यातील वाटंगी आणि पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यातील काळेवाडी ग्रामपंचायतींना 8 लाख रुपयांच्या द्वितीय पुरस्कार विभागून जाहीर करण्यात आला असून सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे आणि खंबाळे ग्रामपंचायतींना तृतीय क्रमांकाचा 6 लाखांचा पुरस्कार विभागून जाहीर करण्यात आला आहे.

बनवडी ग्रामपंचायतीला स्व.वसंतराव नाईक पुरस्कार, वाटंगी ग्रामपंचायतीला डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार तसेच सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर तालुक्यातील भोसे ग्रामपंचायतीला स्व.आबासाहेब खेडेकर असे प्रत्येकी 30 हजार रुपये रक्कमेचे विशेष पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. ( pune divisional level award announced under sant gadgebaba gram swachhta abhiyan )

स्वच्छतेशी आणि ग्रामविकासाशी निगडीत क्षेत्रामध्ये भरीव काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाच्या माध्यमातून तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर पुरस्कार देण्यात येतात. या अभियानांतर्गत पाणी गुणवत्ता व पाणी व्यवस्थापन, शौचालय व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, घर, गाव व परिसर स्वच्छता, वैयक्तीक स्वच्छता व लोकसहभाग आणि वैयक्तीक व सामुहिक पुढाकारातून विकासासाठी राबविण्यात आलेले नाविन्यपूर्ण उपक्रम आदी बाबींची तपासणीच्या आधारे गुणांकन करण्यात येते. विभागस्तरावरील प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या ग्रामपंचायती राज्यस्तरावरील स्पर्धेसाठी पात्र ठरतात.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील विविध समस्या आणि नागरिकांच्या तक्रारीबाबत आमदार शेळकेंनी घेतली अध्यक्षांची भेट
– शाब्बास पोरांनो..! पवना शिक्षण संकुलातील विद्यार्थ्यांचे नाट्यछटा स्पर्धेत घवघवीत यश, आता थेट जिल्हा पातळीवर भिडणार
– सह्याद्री फाउंडेशन आयोजित दहीहंडी उत्सव 2023 अध्यक्षपदी सुनिता कुडे तर कार्याध्यक्षपदी ‘यांची’ निवड । Vadgaon Maval


dainik maval jahirat

Previous Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज? मुंबई-पुणे सोडून कालपासून साताऱ्यातच मुक्काम, नेमकं काय झालंय? वाचा सविस्तर

Next Post

76वा स्वातंत्र्यदिन: यंदाही हर घर तिरंगा अभियान, प्रत्येकाने आपल्या घरी राष्ट्रध्वज उभारुन मानवंदना द्यावी – चंद्रकांत पाटील

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
har-ghar-tiranga

76वा स्वातंत्र्यदिन: यंदाही हर घर तिरंगा अभियान, प्रत्येकाने आपल्या घरी राष्ट्रध्वज उभारुन मानवंदना द्यावी - चंद्रकांत पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Narali-Poornima

नारळी पौर्णिमा विशेष : “सण आयलाय गो, आयलाय गो नारली पुनवेचा…” । कोळीबांधव समुद्रात नारळ का सोडतात? जाणून घ्या

August 28, 2026
Maval Cricketer Sampat Satkar passes away gloom descends on sports world

मावळचे ‘क्रिकेटरत्न’ संपत सातकर यांचे निधन, क्रीडा विश्वावर शोककळा

August 28, 2026
Tata Group called upon to assist flood victims in Lonavala meeting held in presence of MLA Sunil Shelke

लोणावळ्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी टाटा कंपनीचे अधिकारी, जिल्हाधिकारी आणि आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक

August 28, 2026
Horrific accident within limits of Waksai village near Karla Phata Maval speeding car plunges into astream two dead

कार्ला फाट्याजवळील वाकसई गावाच्या हद्दीत भीषण अपघात ; भरधाव कार थेट ओढ्यात कोसळली, दोघांचा मृत्यू

August 28, 2026
Akhand Wari Lifetime Achievement Award 2026 by Kamshet Rural Journalists Association Maval

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने शनिवारी ‘अखंड वारी जीवनगौरव पुरस्कार- २०२६’चे वितरण

August 28, 2026
Maval beloved Omya passes away Bharat Kesari Omya the bull dies

मावळकरांचा लाडका ‘ओम्या’ काळाच्या पडद्याआड ; बैलगाडाशौकीनांमध्ये दुःखाची लाट, ‘भारतकेसरी ओम्या’ बैलाचे निधन

August 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.