गणेशोत्सवानिमित्ताने शासनातर्फे राज्यातील रेशनकार्ड धारकांना ‘आनंदाचा शिधा’ देण्यात येणार आहे. याचा लाभ अंत्योदय अन्नयोजना, प्राधान्य कुटुंब योजना आणि केशरी शिधापत्रिकाधारकांना होणार आहे. राज्यातील शिधापत्रिकाधारकाना गौरी गणपती, दिवाळीसाठी 100 रुपयात आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता. ( anandacha shidha in 100 rupees for ration card holders on occasion of Ganesh Chaturthi 2023 )
असा असेल आनंदाचा शिधा –
प्रत्येकी एक किलोचा रवा, चणाडाळ, साखर आणि एक लिटर खाद्यतेल असा हा शिधा अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे तसेच नागपूर विभागातील वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) व केशरी शिधापत्रिकाधारकांना देण्यात येईल. हा शिधा जिन्नस 19 सप्टेंबर रोजी गौरी गणपती उत्सवानिमित्त व त्यानंतर 12 नोव्हेंबर पासून सुरु होणाऱ्या दिवाळी निमित्त वितरित करण्यात येईल.
राज्यातील एकूण 1 कोटी 65 लाख 60 हजार 256 शिधापत्रिकाधारकांना हा आनंदाचा शिधा मिळेल. या खरेदीसाठी घाऊक बाजारातील दर व अनुषंगीक खर्चासह 827 कोटी 35 लाख इतक्या अंदाजित खर्चास मान्यता देण्यात आली. प्रती संच 239 रुपये या दराने हा शिधा जिन्नस संच खरेदी करण्याचे प्रस्तावित आहे. ( anandacha shidha in 100 rupees for ration card holders on occasion of Ganesh Chaturthi 2023 )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– वडगाव साखळी रस्त्याच्या कामाबाबत नगरपंचायत प्रशासन ऍक्टिव्ह मोडमध्ये; रस्त्याला अडवणूक करणाऱ्यांवर कारवाई होणार
– पवन मावळातील शिळींब गावात भरली ‘भात पिक उत्पादन आणि तंत्रज्ञान विषयावरील शेतीशाळा’, युवा शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
– गुडन्यूज! मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्प 2024 पर्यंत पूर्ण होणार, मंत्री दादा भुसे यांची माहिती, काय आहे मिसिंग लिंक? वाचा