तंत्रज्ञान मोठ्या वेगाने बदलत असून, एकविसाव्या शतकातील विद्यार्थ्यांना बाविसाव्या शतकासाठी सज्ज करण्याची जबाबदारी शिक्षण क्षेत्रावर आली आहे. असे असताना आजही हजारो बालके रस्त्यावर भविष्य पाहत आहेत. अशाच समाजातील वंचित व दुर्लक्षित मुलांना अजित फाऊंडेशन शिक्षण प्रवाहात आणून निवासी शिक्षण देत आहे. ( computer lab at ajit foundation in talegaon through advik hi tech company CSR fund )
ह्या मुलांना पारंपरिक व चाकोरीबद्ध पद्धतीच्या पलीकडे जाऊन अद्ययावत शिक्षण पद्धतीचा वापर करून शिक्षण मिळावे यासाठी अॅडविक हाय-टेक प्रा.लि. सहकार्यातून अजित फाऊंडेशनमध्ये संगणक लॅब उभारणी करण्यात आली आहे. या लॅबचे उदघाटन सुनिल देसाई यांच्या हस्ते झाले. यावेळी विशाल भांगे, सागर झोपे, तन्वी शहा, दिपाली शिंदे, आरती डांगे, कोमल कदम, विनोद काननावर, संतोष हाडवळे, रमेश बर्गे, रावसाहेब महापुरे आदी मान्यवर उपस्थित होते. अजित फाऊंडेशन ही संस्था १६ वर्षापासुन वंचित व उपेक्षित मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी कार्य करत आहे.
सध्या तळेगाव दाभाडे (पुणे) आणि कोरफळे (जि. सोलापुर) येथे विविध पार्श्वभूमी लाभलेली 102 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आता अॅडविक हाय-टेक प्रा. लि. कंपनीने सीएसआर निधीतून संगणक लॅबसह लायब्ररी, स्मार्ट बोर्ड, स्कुल किट, फ्रिज, सीसीटीव्ही,अग्निशमन यंत्र, खेळणी साहित्य यासाठी अजित फाऊंडेशनला 10 लक्ष रुपयांची मदत केली. या मदतीतून संस्थेतील मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी फायदा होणार असल्याचे मत विशाल भांगे यांनी व्यक केले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला. अॅडविक चे सभासद आणि त्यांचे कुटुंबीय भविष्यात या मुलांना संगणक, इंग्रजी भाषा, अकाउंटिंग इत्यादींचे प्रशिक्षण देतील. ( computer lab at ajit foundation in talegaon through advik hi tech company CSR fund )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– वराळे गावात आढळले दुर्मिळ खवल्या मांजर, वन्यजीव रक्षक मावळ संस्थेकडून जीवदान
– मोठी कारवाई! भंडारा डोंगर परिसरात दरोडा टाकणारी टोळी जेरबंद; देशी पिस्तूलांसह इतर हत्यारे आणि मुद्देमाल जप्त
– दुकानदारांनो, सावधान! अनधिकृत वजन काटे विक्री केल्यास किंवा वापरल्यास होणार कडक कारवाई