रविवारी (दि. 20) लोणावळा कुंभेरी येथून एमएच 14 डीएम 9114, एमएच 14 डीएम 9105, एमएच 14 डीएम 6000 अशा तीन खोट्या नंबर प्लेट एकाच पीक अप व्हॅनला लावून लाऊन पोलिसांची दिशाभूल करून पीकअप व्हॅनमध्ये एजंटामार्फत शेतकऱ्यांकडून बैल विकत घेऊन ते कत्तलीसाठी पाठवणार आहे, अशी खात्रीशीर माहिती पवनानगर येथील गोरक्षकांना मिळाली होती. ( Success in saving three native bulls from slaughter here in Kamshet in Maval taluka )
त्यांनी प्रतीक भेगडे यांच्याशी संपर्क साधून सदर माहिती कळवली. प्रतीक भेगडे यांनी वरिष्ठ पोलिस अधिकारी यांच्याशी संपर्क साधून कायदेशीर कारवाई करण्याची विनंती केली. सदर ठिकाणी पवनानगर येथील गोरक्षक सुधीर दहिभाते, ज्ञानेश्वर आंद्रे, विजय मांढुळे, प्रशांत ठाकर, प्रदीप मालुसरे, विश्वास दळवी, निलेश ठाकर यांनी कामशेत पोलिसांच्या मदतीने लोखंडीवाडी येथे सापळा रचून सदर टेम्पो पवनानगर बाजूनी कामशेत दिशेने येताना दिसला. गोरक्षक व पोलिसांच्या मदतीने टेम्पो थांबूवून पाहणी केली असता टेम्पोच्या मागील बाजूस ताडपत्री काढून पाहिले तीन देशी बैल क्रुरतेने बांधलेले दिसले.
त्यांना कसल्याही चारा पाण्याची व्यवस्था केलेली नव्हती. सदर पीक अप व्हॅन पोलिसांच्या मदतीने कामशेत पोलीस स्टेशनला नेण्यात आली. प्रतीक भेगडे यांनी फिर्याद देऊन महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करुन सर्व बैल पुणे पांजरपोळ ट्रस्ट भोसरी इथे सुखरूप सोडण्यात आले. ह्या कारवाईत विजय मांडुळे, प्रशांत आंद्रे, दत्ता ठाकर, सोरभ आंद्रे, अनिकेत आंद्रे, सूरज तोडकर, प्रसाद खराडे, अनिकेत वरघडे, सुभाष भोते इत्यादी गोरक्षकांनी सहभाग घेतला. ह्या कारवाईसाठी मानद पशुकल्याण अधिकारी गोरक्षक शिवशंकर स्वामी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
माहिती – प्रतीक भेगडे
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– एकवीरादेवी देवस्थानच्या संचालकपदी राजकीय नेता नको – उच्च न्यायालय ; वाचा कोर्टाचे निर्देश
– वराळे गावात आढळले दुर्मिळ खवल्या मांजर, वन्यजीव रक्षक मावळ संस्थेकडून जीवदान
– मोठी कारवाई! भंडारा डोंगर परिसरात दरोडा टाकणारी टोळी जेरबंद; देशी पिस्तूलांसह इतर हत्यारे आणि मुद्देमाल जप्त