व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, July 1, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

एकवीरादेवी देवस्थानच्या संचालकपदी राजकीय नेता नको – उच्च न्यायालय ; वाचा कोर्टाचे निर्देश

देवस्थानच्या संचालकपदी गुन्हेगारी आणि राजकीय पार्श्वभूमीचे लोक नकोत, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
August 27, 2023
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, महाराष्ट्र, लोकल
Ekvira-Devi

File Image - Ekvira Devi


कार्ला (ता. मावळ) येथील एकवीरादेवी देवस्थानबाबत मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाचा आदेश दिला आहे. मावळ तालुक्यातील कार्ला येथील प्रसिद्ध एकवीरादेवी देवस्थानमधील राजकीय हस्तक्षेपाला बांध घालणारा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी (दि. 24 ऑगस्ट) दिला आहे. देवस्थानच्या न्यासामधील दोन संचालकांची निवड करताना कोणतीही गुन्हेगारी आणि राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या आणि देवीचे खरे भक्त असलेल्यांचीच निवड व्हावी, यादृष्टीने न्या. सुनील शुक्रे आणि न्या. फिरदोश पूनीवाला यांच्या खंडपीठाने स्पष्ट निर्देश दिले आहेत. ( Bombay High Court Passed An Order On Ekvira Devi Temple Director Election At Karla In Maval Taluka )

देवस्थानाच्या संचालक मंडळातील निवडणुकीवरून दोन गटांमध्ये वाद झाल्यानंतर पुणे सहायक धर्मादाय आयुक्तांकडून अंतिम अहवाल येईपर्यंत उच्च न्यायालयाने 2018 साली मंदिर न्यासावर प्रशासकीय मंडळ नेमले. त्यानंतर न्यायालयाचे अतिरिक्त रजिस्ट्रार यांना पर्यवेक्षक नेमून सहायक धर्मादाय आयुक्तांनी नेमलेल्या अधिकाऱ्यामार्फत संचालक मंडळावरील 7 संचालकांची रितसर निवड करण्यात आली. या 7 संचालकांकडून उर्वरित दोन संचालकांच्या पदांसाठी इच्छुक भक्तांकडून अर्ज मागवून त्यातून निवड केली जाते. त्याप्रमाणे सार्वजनिक सूचना प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर 60 हून अधिक अर्ज आले.

मात्र, या प्रक्रियेत प्रचंड राजकीय हस्तक्षेप होत असल्याचे जाणवल्याने नवी मुंबईतील इच्छुक अर्जदार चेतन पाटील यांनी निरीक्षकांना गोपनीय पद्धतीने निवड होण्याबाबत विनंती केली होती. संचालक मंडळातील 7 संचालकांवर प्रचंड दबाव असल्याने त्यांना जाहीर निवड करण्यास सांगण्याऐवजी गोपनीय पद्धतीने निवड करण्यास सांगावे, अशी विनंती त्यांनी केली होती. मात्र, आपल्या मर्यादित अधिकारांमुळे निरीक्षकांनी त्याबाबत असमर्थता व्यक्त केली. म्हणून पाटील यांनी एड. युवराज नरवणकर यांच्यामार्फत प्रलंबित याचिकेतच हस्तक्षेप अर्ज केला होता. त्यावरील सुनावणीअंती खंडपीठाने निवड मंडळाला अनेक निर्देश देतानाच 29 ऑगस्ट रोजीची निवडप्रक्रिया पुढे ढकलण्याचाही आदेश दिला. ( Bombay High Court Passed An Order On Ekvira Devi Temple Director Election At Karla In Maval Taluka )

न्यायालयाने निवड मंडळाला दिलेले निर्देश

  • मुलाखत घेणाऱ्या निवड मंडळाने सर्व अर्जदारांबाबत गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे अहवाल पुणे पोलिस आयुक्त आणि पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकांकडून मागवावे
  • पुणे पोलिस आयुक्त आणि पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकांनी सात दिवसांच्या आत सर्वांचे अहवाल द्यावे आणि त्यानंतर निवड मंडळाने मुलाखती घ्याव्यात
  • गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या आणि कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेत सदस्य असलेल्या अर्जदारांचा निवड प्रक्रियेत मंडळाने विचार करू नये
  • देवस्थानातील कारभार पूर्णपणे राजकीय हस्तक्षेपमुक्त राहण्याकरिता मंडळाने ही खबरदारी घेणे आवश्यक आहे
  • दोन संचालकांची ही निवडप्रक्रिया सुरळीत होण्याकरिता निवडणूक निरीक्षकांनी विनंती केल्यानंतर पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकांनी सरकारी खर्चाने पोलिस बंदोबस्त पुरवावा

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट निवडणूकीचा निकाल जाहीर, अत्यंत चुरशीच्या लढतीत ‘यांनी’ मारली बाजी, वाचा निकाल सविस्तर
– श्री एकविरा देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त मंडळ राज ठाकरेंच्या भेटीला; देवस्थानबाबत राज ठाकरेंचा ग्रामस्थांना शब्द, म्हणाले…
– एकविरा देवीच्या उत्सवादरम्यान लोणावळा पोलिसांची मोठी कारवाई! बेकायदा विदेशी मद्यसाठ्यासह 3 जण ताब्यात


Previous Post

वराळे गावात आढळले दुर्मिळ खवल्या मांजर, वन्यजीव रक्षक मावळ संस्थेकडून जीवदान

Next Post

दैनिक मावळ बुलेटीन : वाचा मावळ तालुक्यातील महत्वाच्या सर्व बातम्या एका क्लिकवर

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारितेत मागील 7 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. अनेक शोधनिबंध प्रसिद्ध. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
dainik-maval-News-bulletin

दैनिक मावळ बुलेटीन : वाचा मावळ तालुक्यातील महत्वाच्या सर्व बातम्या एका क्लिकवर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Vidhan Sabha Former MLA Krishnarao Bhegde Passes Away Talegaon Dabhade

मावळचा आधारवड हरपला ! मावळभूषण, माजी आमदार कृष्णराव भेगडे यांचे निधन । Former MLA Krishnarao Bhegde Passes Away

June 30, 2025
Shri Sant Tukaram Cooperative Sugar Factory

श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे ऊस लागवडीबाबत धोरण जाहीर – वाचा सविस्तर

June 30, 2025
Pavana-Dam-Maval

पवना धरणात 58 टक्के पाणीसाठा ! गतवर्षीपेक्षा 40 टक्क्यांहून अधिक जलसाठा । Pawana Dam Updates

June 30, 2025
Gopinath Munde Farmers Accident Safety Sanugraha Grant Scheme Documents Procedure Information

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना : शेतकरी कुटुंबासाठी मोठा आर्थिक आधार !

June 30, 2025
Maval Taluka Marathi Journalists Association established Sudesh Girme elected as president see entire committee

मावळ तालुका मराठी पत्रकार संघाची स्थापना; अध्यक्षपदी सुदेश गिरमे, कार्याध्यक्षपदी विशाल विकारी यांची निवड – पाहा संपूर्ण कार्यकारिणी

June 30, 2025
10 foot python found in Boraj village Maval Wildlife conservationists release python into natural habitat

बोरज गावात आढळला 10 फुटी अजगर ; वन्यजीव रक्षकच्या सर्पमित्रांकडून अजगराची नैसर्गिक अधिवासात मुक्तता

June 30, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.