शिवदुर्ग मित्र लोणावळा, वन्यजीव रक्षक मावळ आणि पाटण ग्रामस्थ यांनी रविवारी मध्यरात्री रेस्क्यू ऑपरेशन राबवून एका युवकाचे प्राण वाचवले आहे. अर्जुन पाटील, शैलेश गायकवाड, विक्रम जाधव, उतारेश्वर सुरवस हे 4 मित्र पुण्याहून (मुळचे सर्व मिरज सांगली ) किल्ले विसापूर इथे दुपारी 1 वाजता फिरायला आले होते. सायंकाळी पाच वाजता यातील अर्जुन पाटील हा इतर मित्रापासुन बाजूला चालत गेला आणि वाट चुकला. ‘मी वाट चुकलो असून खाली गावाकडे चाललो आहे असा पहिला फोन सोबतच्या मित्रांना केला. आणि थोड्या वेळाने मी पडलो आहे मला मदतीला या’ असा फोन केला. ( midnight rescue operation to save youth at Visapur Fort Maval )
त्याच्या बरोबरचे मित्र त्याला शोधत खाली गावापर्यंत आले. गावातील लोकांना घडलेली घटना सांगितली आणि गावातील काही तरुण अर्जुनला शोधण्यासाठी निघाले. त्याचवेळी शिवदुर्ग रेस्कू टीमला सात वाजता मेसेज आला होता. पण स्थानिक लोक त्याला शोधून खाली गावात घेऊन येतील म्हणून वाट पाहात थांबले होते. रात्री 9.20 ला स्थानिक लोकांनी फोन केला की मदतीला यावे लागेल. त्याचा एक हात फ्रॅक्चर झाला होता आणि मुका मार लागला होता. हनुवटीला मार लागून काही दात पडले होते. त्यानंतर शिवदुर्ग टीम लोणावळा हे रेस्क्यूकरिता निघाले.
अर्जुन उभा राहत होता, पण त्याला चालता येत नव्हते. वाटेत धबधबे, चिकट शेवाळलेले दगड, चिखल, दाट झाडी झुडपे यामध्ये त्याला जखमी असल्याने चालणे कठीण जात होते. म्हणून स्पाइन बोर्ड लावून स्केडच्या स्ट्रेचरच्या माध्यमातून गावात आपले. पाटण गावातील लोकांनी या कामे खुप सहकार्य केले. रात्री 12 वाजता गावात सर्वजण पोहोचले.
गावातील लोकांनी त्यांची चहा पाण्याची सोय केली. अर्जूनला बदलण्यासाठी कपडे दिले. त्याचे मित्र तोपर्यंत पाटणपर्यंत पोहचले होते. त्यांच्या गाडीत अर्जुनाला बसवून दिले आणि इतर मित्राना लोणावळा रेल्वे स्टेशनला सोडून सर्व रेस्क्यू टीम घरी पोहोचली. रविववारी रात्री सुमारास राबवलेल्या या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये शिवदुर्ग मित्र लोणावळा आणि वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य योगेश उंबरे, प्रणय अंभूरे, कुणाल कडु, रतन सिंग, आदित्य पिलाने, सिध्देश निसाळ, अमोल सुतार, योगेश दळवी, मयुर दळवी, सागर कुंभार, अजय मयेकर, चंद्रकांत बोंबले, अनिल आंद्रे, सुनिल गायकवाड, संभाजी तिकोणे, रवींद्र तिकोणे, विनायक तिकोणे आणि पाटन ग्रामस्थ सहभागी झाले होते. ( midnight rescue operation to save youth at Visapur Fort Maval )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील कामशेत इथे तीन देशी बैलांना कत्तलीपासून वाचवण्यात यश!
– तळेगावात अजित फाऊंडेशनमध्ये अॅडविक हाय-टेक कंपनीच्या सीएसआर निधीतून संगणक लॅब
– दैनिक मावळ बुलेटीन : वाचा मावळ तालुक्यातील महत्वाच्या सर्व बातम्या एका क्लिकवर