व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, September 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘मला आशा आहे आपण माझ्या विनंतीचा स्विकार कराल’, राज ठाकरेंचे फडणवीसांना खुले पत्र, अंधेरी पोटनिवडणूकीत नवा ट्विस्ट

अंधेरी पूर्व विधानसभा पोट निवडणुकीसाठी ( Andheri East Bypoll ) उद्धव ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके ( Rutuja Latke ) आणि भाजपाचे उमेदवार मुरजी पटेल ( Murji Patel ) यांच्यात थेट लढत होणार आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
October 16, 2022
in महाराष्ट्र
Raj-Thackeray-Devendra-Fadanvis

Photo : MNS Chief Raj Thackeray letter to BJP Devendra Fadnavis


अंधेरी पूर्व विधानसभा पोट निवडणुकीसाठी ( Andheri East Bypoll ) उद्धव ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके ( Rutuja Latke ) आणि भाजपाचे उमेदवार मुरजी पटेल ( Murji Patel ) यांच्यात थेट लढत होणार आहे. ही पोटनिवडणूक जिंकण्यासाठी शिंदे गट-भाजपा तसेच उद्धव ठाकरे गट पूर्ण ताकदीने मैदानात उतरले आहेत. मात्र, या ठिकाणी मनसेची भूमिका काय असणार, याकडे सर्वांचे डोळे लागले होते. अशात मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS Chief Raj Thackeray ) यांनी या निवडणुकीसंदर्भात त्यांची भुमिका स्पष्ट केली असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांना पत्र लिहित भाजपाने ही निवडणूक लढवू नये, अशी विनंती देखील केली आहे.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

राज ठाकरे यांचे देवेंद्र फडणवीस यांना पत्र, वाचा जसेच्या तसे….

प्रति,
देवेंद्र फडणवीस – उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या दुर्दैवी निधनानंतर अंधेरी पूर्व विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झालेली आहे. या जागेवर रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.

कै. रमेश लटके हे चांगले कार्यकर्ते होते. अगदी शाखा प्रमुखापासून त्यांची वाटचाल सुरू झालेली आहे. त्यांच्या राजकीय प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीने आमदार होण्याने कै. रमेश यांच्या आत्म्याला खरोखर शांती मिळेल.

माझी विनंती आहे की, भारतीय जनता पक्षाने ही निवडणूक लढवू नये आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके आमदार होतील हे पाहावं

मी माझ्या पक्षातर्फे अशा परिस्थितीत जेव्हा दिवंगत आमदाराच्या घरच्या व्यक्ती निवडणूक लढवतात, तेव्हा शक्यतो निडणूक न लढवण्याचे धोरण स्वीकारतो. तसे करण्याने आपण त्या दिवंगत लोकप्रतिनिधीला श्रद्धांजलीच अर्पण करतो, अशी माझी भावना आहे. आपणही तसं करावं, असं मला माझे मन सांगतं.

असं करणं हे आपल्या महाराष्ट्राच्या महान संस्कृतीशी सुसंगतही आहे. मला आशा आहे आपण माझ्या विनंतीचा स्वीकार कराल.

आपला मित्र,
राज ठाकरे

आमदार कै. रमेश लटके ह्यांच्या दुर्दैवी निधनानंतर अंधेरी (पूर्व) विधानसभा पोट-निवडणुकीबाबत उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस ह्यांना नम्र आवाहन आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची धोरणात्मक भूमिका.@Dev_Fadnavis pic.twitter.com/78nfA21hDP

— Raj Thackeray (@RajThackeray) October 16, 2022

आता राज ठाकरे यांच्या या पत्रानंतर भाजपा नेमकी काय भुमिका घेणार हे पहावे लागेल. ( MNS Chief Raj Thackeray Appeals BJP Devendra Fadnavis Not To Contest Andheri East By Election Against Rutuja Latke )

अधिक वाचा –

Video : पवनानगर येथील कीर्तनाला पंचक्रोशीतील हजारो नागरिकांची उपस्थिती, आमदार शेळकेंचा वाढदिवसही साजरा
भाजपाच्या आंदोलनाचा दणका! मावळचे सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक विठ्ठल सूर्यवंशी यांचे अखेर निलंबन


dainik maval jahirat

Previous Post

Video : पवनानगर येथील कीर्तनाला पंचक्रोशीतील हजारो नागरिकांची उपस्थिती, आमदार शेळकेंचा वाढदिवसही साजरा

Next Post

पुणे-लोणावळा मार्गावरील कासारवाडीतील रेल्वे फाटक पाच दिवस बंद, वाचा सविस्तर

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Pune-Lonavla-Local

पुणे-लोणावळा मार्गावरील कासारवाडीतील रेल्वे फाटक पाच दिवस बंद, वाचा सविस्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.