पवनानगर ( Pavananagar ) इथे मावळ तालुक्याचे आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त ह.भ .प समाधान महाराज शर्मा यांची कीर्तनरूपी सेवा आयोजित करण्यात आली होती. शनिवार (दिनांक 15 ऑक्टोबर) रोजी पवनानगर चौकात श्री गणेश मंदिराजवळ झालेल्या या कीर्तनासाठी पंचक्रोशीतील हजारो नागरिक आणि वारकरी बंधू भगिनी उपस्थित होते. तसेच, यावेळी उपस्थितांच्या समोर आमदार शेळके यांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. ( MLA Sunil Shelke Birthday Kirtan at Pavananagar )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
View this post on Instagram
दिनांक 20 ऑक्टोबर रोजी आमदार सुनिल शेळके यांचा वाढदिवस असतो. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण तालुक्यात विविध ठिकाणी शेळके यांचे समर्थक आणि कार्यकर्ते विविध कार्यक्रमाचे आयोजन करत आहेत. पवन मावळ वारकरी सांप्रदाय, श्री विठ्ठल परिवार मावळ आणि पवन मावळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्याकडून आमदार शेळकेंच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शनिवारी पवनानगर येथे ह.भ.प समाधान महाराज शर्मा यांचा सुश्राव्य कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला होता.
अधिक वाचा –
Video : निसर्ग सौंदर्याचा अद्भूत नजारा, घोराडेश्वर डोंगरावर पसरलीये फुलांची भगवी चादर
आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त ‘महाआरोग्य शिबिर’, पाहा कधी आणि कुठे आहे शिबिर I MLA Sunil Shelke Birthday