रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) नाणे मावळ विभाग यांच्या वतीने बुधवार (12 ऑक्टोबर) रोजी कामशेत येथील गुरुदत्त मंगल कार्यालय इथे पक्षाचा जाहीर मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात आरपीआय (आठवले) पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष तसेच पुणे जिल्हा अध्यक्ष सुर्यकांत वाघमारे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. तसेच, नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान करत त्यांचाही सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरपीआय मावळ तालुका वरिष्ठ उपाध्यक्ष विजय गोपाळराव देसाई हे होते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
यावेळी सुर्यकांत वाघमारे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तसेच आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकांच्या अनुषंगाने तयारीला लागण्याचे आणि पक्ष संघटना बळकट करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश दिले. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी आरपीआय (आठवले) पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला. तसेच, अनेक कार्यकर्त्यांना नवनवीन जबाबदारी देत त्यांंच्या नियुक्तीचे पत्र वाटप करण्यात आले. त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांत नवा उत्साह दिसून आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरचिटणीस किसन आहिरे यांनी केले. सुत्रसंचालन विकास शिंदे, सिद्धार्थ चावरे यांनी केले. आभार प्रदर्शन रवी गायकवाड आणि अनिल गायकवाड यांनी केले. तर, आरपीआय तालुका अध्यक्ष लक्ष्मण भालेराव, पुणे जिल्हा सरचिटणीस गणेश गायकवाड, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष विक्रम शेलार, खेड तालुका अध्यक्ष दिलीप नाईकनवरे, युवा जिल्हा अध्यक्ष समीर जाधव, बबनराव ओव्हाळ, यमुना साळवे, मालन बनसोडे, भावना ओव्हाळ, अनिता वाघमारे आदी मान्यवर यांची प्रमुख उपस्थिती होती. ( Public Meeting By Republican Party of India Athawale Group Nane Maval Division In Kamshet City )
अधिक वाचा –
वडगाव शहरात कॅन्सर तपासणी शिबीर, जैन प्रकोष्ठ – महाराष्ट्र प्रदेश आणि वडगाव भाजपाचा कौतुकास्पद उपक्रम
भाजपाच्या आंदोलनाचा दणका! मावळचे सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक विठ्ठल सूर्यवंशी यांचे अखेर निलंबन