वडगाव मावळ ( Vadgaon Maval ) येथे मोफत कर्करोग तपासणी शिबिराचे ( Cancer screening camp ) उद्घाटन मावळ तालुका भाजपा अध्यक्ष रविंद्र भेगडे यांच्या हस्ते आणि मावळ तालुका भाजपा प्रभारी भास्करराव म्हाळसकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच वडगांव शहर भाजपा अध्यक्ष अनंता कुडे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक शिवाजीराव टाकवे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
AIJMF चे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी, भाजपा जैन प्रकोष्ठचे प्रदेश प्रमुख संदीप भंडारी यांच्या माध्यमातून आणि स्वप्नील शहा, गिरीश पारख, डॉ. योगेश पाटणी यांच्या समन्वयातून वडगांव मावळ येथे मा नगरसेवक भूषण मुथा यांच्या विशेष प्रयत्नांतून अत्याधुनिक मोबाईल डिटेक्शन बस मध्ये मॅमोग्राफी, पॅप्समेयर, डिजिटल एक्सरे या सेवेद्वारे गर्भाशयाचा, स्तनाचा, प्रोस्टेट, तोंडाचा आणि ब्रॉंकोयटीस कॅन्सर असे विविध प्रकारच्या कॅन्सरच्या हजारो रुपयांच्या तपासण्या मोफत करण्यात आल्या. ( Cancer screening camp In Vadgaon Maval city )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
श्री पोटोबा देवस्थान संस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, ज्येष्ठ नेते सोपानराव ढोरे, अरविंद पिंगळे, बाळासाहेब कुडे, अॅड. तुकाराम काटे, अखिल भारतीय वारकरी मंडळ वडगांवचे अध्यक्ष नारायणराव ढोरे, वडगांव विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक किसनराव भेगडे, गोपाळराव भिलारे, दिपक बवरे, सुरेश भंडारी, मावळ विचार मंचाचे अध्यक्ष सुदेश गिरमे, वसंतराव भिलारे, सोमनाथ काळे, दिपक पवार, नंदकिशोर गाडे, बारकू खांदवे, माजी उपसभापती, नगरसेवक प्रवीण चव्हाण, कार्याध्यक्ष आणि माजी नगरसेवक प्रसाद पिंगळे, संघटन मंत्री किरण भिलारे, गटनेते दिनेश ढोरे, माजी सरपंच नितीन कुडे, सरचिटणीस मकरंद बवरे, नगरसेवक दिलीप म्हाळसकर, नगरसेवक किरण म्हाळसकर, नगरसेवक श्रीधर चव्हाण, वडगांव विविध कार्यकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन निलेश म्हाळसकर, महिला मोर्चा अध्यक्षा धनश्रीताई भोंडवे, खंडूशेठ भिलारे, रविंद्र म्हाळसकर, शरद मोरे, प्रसिद्धीप्रमुख अमोल ठोंबरे, बाळासाहेब भिलारे, मोरेश्वर पोफळे, प्रमोद म्हाळसकर, शंकरराव भोंडवे, महेश ब. म्हाळसकर, हरिश दानवे, महेंद्र बा. म्हाळसकर, शेखर वहिले, महेंद्र अ. म्हाळसकर, सचिन कराळे, आकाश म्हाळसकर, अरुण सुळके आदी उपस्थित होते.
डॉ. लता राघव, डॉ. मनोज पाटील, लॅब टेक्निशियन जगजीत सिंह, शितल काकरे आदींनी या शिबिरात सहभागी झालेल्या नागरिकांच्या तपासण्या केल्या. मावळ भाजपा तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे यांनी आपल्या मनोगतात या उपक्रमाचे कौतुक करत मावळ तालुका कॅन्सरमुक्त व्हावा असे मत व्यक्त केले. भाजपा शहराध्यक्ष अनंता कुडे यांनी आपल्या मनोगतात नागरिकांनी स्वतःहुन आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले. वडगांव नगरपंचायतीचे मा.नगरसेवक भूषण मुथा यांनी प्रास्ताविक केले ज्यात त्यांनी या उपक्रमाची माहिती दिली. सूत्रसंचालन सरचिटणीस कल्पेश भोंडवे यांनी केले. आभार प्रदर्शन युवा मोर्चा अध्यक्ष विनायक भेगडे यांनी केले. नागरिकांनी या अभिनव आणि अत्यावश्यक उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले.
अधिक वाचा –
भाजपाच्या आंदोलनाचा दणका! मावळचे सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक विठ्ठल सूर्यवंशी यांचे अखेर निलंबन
पॉलिहाऊस उभारणीची मर्यादा किमान 5 एकर करावी, मावळमधील शेतकऱ्यांची केंद्रीय कृषिमंत्र्यांकडे मागणी