केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर हे सध्या महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर आले आहेत. या दरम्यान मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेत त्यांच्याकडे विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.
शेतकऱ्यांच्या या शिष्टमंडळात मावळमधील शेतकरी मुकुंद ठाकर, ज्ञानेश्वर आडकर, दिलीप काळे, तानाजी शेंडगे, चंद्रकांत कालेकर, हेमंत कापसे, जयसिंग हुलावळे ज्ञानेश्वर ठाकर, रामदास पवार आदींचा समावेश होता. ( Union Agriculture Minister Narendra Singh Tomar visit to Maharashtra Met Maval taluka farmers )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
शिष्टमंडळाने केलेल्या मागण्या…
1) कृत्रिम फुलांवर बंदी घालावी
2) पॉलिहाऊस उभारणीची मर्यादा किमान पाच एकरपर्यंत करावी
3) पॉलिहाऊस उभारणीचा खर्च चालू बाजारभावा प्रमाणे धरावा
4) पॉलिहाऊस उभारणीचे स्टीलवरील जीएसटी 18 वरून पाच टक्के करावा
5) पॉलिहाऊसचे अनुदान मिळण्याची प्रक्रिया सुलभ करावी
6) मावळ तालुक्यामध्ये ऑक्शन सेंटर उभारावे
7) विमा पॉलिसी धोरणामध्ये बदल करावा
8) माल निर्यात करताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी सोडवाव्यात
अधिक वाचा –
पवनमावळमधील अनेक गावांत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान भात पिक प्रकल्प अंतर्गत शास्त्रज्ञ भेट
वडगावात ढोरेवाडा येथे घरफोडी, ‘इतक्या’ लाखाचा ऐवज लंपास, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण I Vadgaon Maval