व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, December 11, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

दिवंगत माजी आमदार कृष्णराव भेगडे यांना महाराष्ट्र विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात श्रद्धांजली अर्पण !

महाराष्ट्र विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या मुंबईत सुरू आहे. यादरम्यान सोमवारी (दि. ३० जून) मावळचे माजी आमदार कृष्णराव भेगडे यांचे दुःखद निधन झाले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 3, 2025
in ग्रामीण, ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, मावळकट्टा, लोकल, शहर
Tributes paid to late former MLA Krishnarao Bhegde in both houses of Maharashtra Legislative Assembly

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : महाराष्ट्र विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या मुंबईत सुरू आहे. यादरम्यान सोमवारी (दि. ३० जून) मावळचे माजी आमदार कृष्णराव भेगडे यांचे दुःखद निधन झाले. विधानसभेचे माजी सदस्य दिवंगत कृष्णराव भेगडे यांना विधानसभेत श्रद्धांजली वाहण्यात आली. दिवंगत सदस्य भेगडे यांच्या दुःखद निधनाबद्दल विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी या संदर्भातील शोक प्रस्ताव मांडला आणि दिवंगत सदस्याच्या स्मृतींना उजाळा दिला.

कृष्णराव भेगडे यांना विधानपरिषदेत श्रद्धांजली
माजी विधानपरिषद सदस्य कृष्णराव धोंडीबा भेगडे यांच्या निधनाबद्दल विधानपरिषदेत शोक प्रस्ताव मांडून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सभापती प्रा.राम शिंदे यांनी शोक प्रस्ताव मांडला. सभापती प्रा. राम शिंदे यांनी कृष्णराव धोंडीबा भेगडे यांच्या निधनाबद्दल सभागृहाच्यावतीने दुःख व्यक्त केले.

  • शोक प्रस्ताव मांडताना ते म्हणाले की, दिवंगत कृष्णराव धोंडीबा भेगडे यांचा जन्म १० ऑगस्ट १९३६ रोजी तळेगाव दाभाडे (ता. मावळ, जि. पुणे) येथे झाला. भेगडे यांनी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ, मावळ या संस्थेच्या माध्यमातून गोर-गरीब विद्यार्थ्यांसाठी शाळा, महाविद्यालये सुरू केले. मावळ तालुक्यातील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षणाच्या सोयी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी त्यांनी विशेष योगदान दिले होते. त्यांनी तळेगाव जनरल हॉस्पिटल संस्था गोर-गरीब रुग्णांची सेवा करण्यासाठी निर्माण केली. त्यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, इंद्रायणी औद्योगिक सहकारी संस्थेचे चेअरमन, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष म्हणूनही उत्तम कार्य केले.

त्यांनी अनेक आंदोलनात भाग घेतला होता. कर्जग्रस्त शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले होते. मावळ तालुक्यात जलव्यवस्थापन योजना राबवून त्यांनी हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली आणली होती. शेतकरी, शेतमजूर, कामगार यांच्या कल्याणासाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले होते. दिवंगत भेगडे हे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे अनेक वर्ष सदस्य होते. सन १९७२ व १९७८ मध्ये पुणे जिल्ह्यातील मावळ मतदारसंघातून ते महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते तर, सन १९९२ ते १९९३ व १९९४ ते २००० या कालावधीत महाराष्ट्र विधानपरिषदेचे ते सदस्य होते.

विधानमंडळाच्या अनेक समित्यांवर त्यांनी काम केल्याची माहिती सभापतींनी दिली. या प्रस्तावावर सर्व सदस्यांनी स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहिली आणि शोक प्रस्तावास समर्थन दिले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आमदार सुनील शेळके यांनी शासनाची हजारो कोटींची रॉयल्टी बुडवली ! खासदार संजय राऊत यांचा गंभीर आरोप, थेट मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
– पवन मावळात पावसाचा जोर वाढला, पवना धरण 66 टक्के भरले ! गतवर्षीपेक्षा 48 टक्क्यांहून अधिक पाणीसाठा । Pawana Dam Updates
– VIDEO : कुणाच्याही डोळ्यात पाणी येईल… लातूर जिल्ह्यातील वृद्ध शेतकरी आजीआजोबांचा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ


dainik maval jahirat

Previous Post

कुंडमळा पूल दुर्घटना ; चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती, दोषींवर कठोर कारवाई करणार – मंत्री शिवेंद्रसिंह भोसले

Next Post

मोठी बातमी : घरकुलांसाठी स्थानिक वाळू घाटांमधून पाच ब्रास वाळू तहसीलदारार्फत मोफत मिळणार ; महसूल मंत्र्यांची माहिती

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
sand

मोठी बातमी : घरकुलांसाठी स्थानिक वाळू घाटांमधून पाच ब्रास वाळू तहसीलदारार्फत मोफत मिळणार ; महसूल मंत्र्यांची माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lonavala Municipal Council General Election

लोणावळा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराची अखेरच्या दिवशी माघार । Lonavala Nagar Parishad

December 10, 2025
Talegaon-Dabhade-Police-Station

गांजा विक्री प्रकरणी महिला आरोपीस अटक ; तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे हद्दीतील घटना । Talegaon Dabhade

December 10, 2025
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana

लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची अपडेट ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अधिवेशनात मोठी घोषणा

December 10, 2025
traffic-jams-old-Mumbai-Pune-highway

वडगावकरांची सकाळ वाहतूक कोंडीने ; वडगाव कमानीजवळ अवजड वाहन बंद पडल्याने महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

December 10, 2025
Maval taluka First in rose export in Maharashtra Valentine Day Special

इंडिगो एअरलाईन्सच्या सेवा खंडीत होण्याचा मावळातील फूल उत्पादकांना फटका ; कोट्यवधीचे नुकसान

December 10, 2025
people will decide mayor but what about deputy mayor Candidates started fielding for deputy mayor post

नगराध्यक्षाचं जनता ठरवेल, पण उपनगराध्यक्षाचं बोला ! उमेदवारांकडून उपनगराध्यक्षपदासाठी फिल्डिंग लावायला सुरूवात

December 9, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.