Dainik Maval News : लातूर जिल्ह्यातील या वृद्ध शेतकरी आजीआजोबांचा व्हिडिओ हृदय पिळवटून टाकणारा आहे. पोटाची भूक भागविण्यासाठी या वृद्ध दाम्पत्याला स्वतः राबावं लागतंय. हे आजीआजोबा स्वतःच शेत नांगरतात कारण बैल घ्यायला पैसे नाहीत, ट्रॅक्टर भाड्याने घ्यायला पैसे नाहीत, बी बियाणे, खतांच्या किंमती वाढल्या आहे. डोक्यावर कर्ज आहे. त्यामुळे जे पेरतोय ते विकून संसाराचा गाडा चालावा त्यासाठीचीही काटकसर.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी एकनाथ खडसे यांनीही हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. आपल्या एक्स अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट करीत त्यांनी सरकारला लक्ष केले आहे. सरकार कर्जमाफी करत नाही, चांगली धोरणं राबवत नाही, महागाई कमी करणे तर विसरायचंच. हे दृश्य बघूनही सरकारला पाझर फुटत नसेल तर सरकार किती गेंड्याच्या कातडीचे आहे यातून लक्षात येते., अशी टीका खडसे यांनी सरकारवर केली आहे.
एकीकडे आपण बळीराजासाठी योजनांच्या घोषणांचा पाऊस पडताना पाहतोय. परंतु वास्तवात शेतकरी राजा किती हलाखीचे आयुष्य जगतोय, हे यातून समजून घेता येईल. दैनिक मावळचे लातूर जिल्ह्यातील सहकारी माऊली परांडे, राजेंद्र धुळेशेट्टे यांच्या माध्यमातून सदर आजी, आजोबांची व्यथा आपण समजावून घेतली आहे.
पाहा व्हिडिओ :
लातूर जिल्ह्यातील या वृद्ध शेतकरी आजीआजोबांचा व्हिडिओ हृदय पिळवटून टाकणारा आहे. पोटाची भूक भागविण्यासाठी या वृद्ध दाम्पत्याला स्वतः राबावं लागतंय !
(व्हिडिओ व बातमी सौजन्य : माऊली परांडे, राजेंद्र धुळेशेट्टे, लातूर) #latur #farmer #video #farmernews #farmervideo #maharashtra pic.twitter.com/3wHXxdkQlm
— Dainik Maval दैनिक मावळ (@DainikMaval) July 2, 2025
View this post on Instagram
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळचा आधारवड हरपला ! मावळभूषण, माजी आमदार कृष्णराव भेगडे यांचे निधन । Former MLA Krishnarao Bhegde Passes Away
– “कृष्ण मेघांची छाया हरपली…” स्व. कृष्णराव भेगडे यांचे कधीही न पाहिलेले फोटो – पाहा फक्त दै. मावळवर । Krishnarao Bhegde Passes Away
– मोठी बातमी! श्री एकविरा देवस्थानकडून ड्रेस कोड जाहीर; महिला-पुरुषांनी मंदिरात येताना ‘असे’ कपडे परिधान करणे बंधनकारक