व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, June 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी बातमी! श्री एकविरा देवस्थानकडून ड्रेस कोड जाहीर; महिला-पुरुषांनी मंदिरात येताना ‘असे’ कपडे परिधान करणे बंधनकारक

कार्ला (ता. मावळ) येथील श्री एकविरा देवस्थान ट्रस्टने आई श्री एकविरा देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 29, 2025
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, महाराष्ट्र, मावळकट्टा, लोकल, शहर, शहर
Ekvira-Devi

File Image - Ekvira Devi


Dainik Maval News : कार्ला (ता. मावळ) येथील श्री एकविरा देवस्थान ट्रस्टने आई श्री एकविरा देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आणि आग्री, कोळी समाजाचे कुलदैवत असलेल्या कुलस्वामिनी आई एकवीरा देवी मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी अर्थात महिला पुरुषांसाठी ७ जुलैपासून पोषाखाबाबत ही नियमावली लागू असणार आहे.

Novel NIBR Ads

शुक्रवारी (27 जून) देवस्थान ट्रस्टची याबाबत बैठक संपन्न झाली. त्यात सर्व सदस्यांच्या एकमताने हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार, मंदिरात येणाऱ्या भाविकांनी भारतीय पारंपरिक पोशाख परिधान करावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे. देवस्थान ट्रस्टच्या निर्णयानुसार हा ड्रेस कोड 7 जुलै 2025 पासून प्रत्यक्षात येणार आहे.

ड्रेस कोडचे नियम पुढीलप्रमाणे असतील –
महिलांसाठी : साडी, सलवार-कुर्ता किंवा अन्य भारतीय पारंपरिक पोशाख
पुरुषांसाठी : धोतर-कुर्ता पायजमा कुर्ता, पँट-शर्ट किंवा पारंपरिक वेशभूषा

या पोषाखास बंदी –
मंदिरात येताना वेस्टर्न ड्रेस, शॉर्ट्स, मिनी स्कर्ट्स, हाफ पँट्स, फाटलेली जीन्स यांसारखे पोशाख वर्ज्य करण्यात आले आहेत.

ड्रेस कोड बाबत घेण्यात आलेल्या बैठकीस ट्रस्टचे अध्यक्ष दीपक हुलावळे, प्रमुख विश्वस्त खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे, उपाध्यक्ष सागर देवकर, सचिव नवनाथ देशमुख, सहसचिव महेंद्र देशमुख, सहखजिनदार विकास पडवळ तसेच विश्वस्त पूजा अशोक पडवळ आदी पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते.

Novel NIBR Ads

मंदिरातील धार्मिक वातावरणाची पवित्रता टिकवण्यासाठी आणि पारंपरिक मूल्यांना सन्मान देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तळेगाव एमआयडीसी औद्योगिक क्षेत्र भयमुक्त राहण्यासाठी पोलीस कटिबद्ध ; पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांचे आश्वासन
– आषाढी यात्रेसाठी ५ हजार २०० विशेष बस सोडणार ; ग्रुप बुकींग असल्यास कोणत्याही गावातून थेट पंढरपूरपर्यंत एसटी मिळणार
– Jeevan Bhalerao : परदेशातून पदवी घेत आईवडिलांचे स्वप्न केले साकार; हिंजवडी येथील ‘जीवन’चा कुंभार समाजातील युवकांपुढे नवा आदर्श


dainik maval jahirat

Previous Post

तळेगाव नगरपरिषदेच्या वतीने बांबू, शेवगा आदी देशी वृक्षांच्या लागवडीसाठी नागरिकांना आवाहन । Talegaon Dabhade

Next Post

आदिवासी विकासासाठी ठोस निर्णयांची बैठक ; जिल्हाधिकारी कार्यालयात महाअभियानांचा आढावा

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Meeting of concrete decisions for tribal development Review of campaign at Collector Office Pune

आदिवासी विकासासाठी ठोस निर्णयांची बैठक ; जिल्हाधिकारी कार्यालयात महाअभियानांचा आढावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

drowning

मोठी बातमी ! इंद्रायणी नदीत बुडून २४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

June 23, 2026
Groom loses his life while trying to take selfie dies after falling from Lohagad Fort Maval Pune

होणाऱ्या बायकोनेच केला गेम? लोहगड किल्ल्यावरून पडून मृत्यू झालेल्या केतन अग्रवाल प्रकरणाला नवे वळण, आज पोलिसांची पत्रकार परिषद

June 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

मोठी बातमी! तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेवकाचे जात प्रमाणपत्र जिल्हा समितीकडून अवैध

June 22, 2026
ST BUS to Pandharpur

आषाढी यात्रेसाठी एसटीच्या 5,500 विशेष बसेस; कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी मागणी केल्यास थेट बस सेवा

June 22, 2026
‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

June 21, 2026
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

June 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.