व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, August 12, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगावमधील शुभम कॉम्प्लेक्स समोर मालवाहतूक ट्रकचा अपघात, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली । Talegaon Dabhade

मुंबईच्या दिशेने जाणारा हा ट्रक अचानक उतारावरून पुढे सरकत कॉम्प्लेक्सच्या चौथऱ्यावर जाऊन अडकला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 5, 2026
in शहर, लोकल
Freight truck accident in front of Shubham Complex in Talegaon Dabhade

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गालगत तळेगाव दाभाडे शहरात असलेल्या शुभम कॉम्प्लेक्स जवळ सोमवारी (दि. 4 मे) पहाटेच्या सुमारास एक मालवाहतूक ट्रक अपघातग्रस्त झाल्याची घटना घडली.

मुंबईच्या दिशेने जाणारा हा ट्रक अचानक उतारावरून पुढे सरकत कॉम्प्लेक्सच्या चौथऱ्यावर जाऊन अडकला. सुदैवाने यावेळी परिसर निर्मणुष्य असल्याने मोठी दुर्घटना टळली व कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक ( क्र. MH 09 CU 9390) मध्ये गव्हाच्या गोण्या पूर्ण क्षमतेने भरलेल्या होत्या. पहाटे साडेपाच ते सहाच्या दरम्यान चालकाने मालमोटर शुभम कॉम्प्लेक्ससमोर उभी करून खाली उतरला होता. काही मिनिटांतच ही मालमोटर उतारामुळे पुढे सरकली आणि मोकळ्या जागेतील नामफलकांचे खांब तोडत पुढे गेली.

यावेळी समोर उभी असलेल्या मोटारसायकलला जोरदार धडक बसली. धडकेनंतर मोटारसायकल पुढील चाकाखाली अडकून पूर्णपणे चक्काचूर झाली, तर मालमोटरचे पुढील चाक चार फूट खोल असलेल्या चौथऱ्यात अडकले. हा परिसर अत्यंत वर्दळीचा असला तरी अपघाताच्या वेळी पहाटेची वेळ असल्याने परिसर निर्मनुष्य होता.

विशेष म्हणजे, संबंधित मोटारसायकल चालक त्या वेळी शेजारील रुग्णालयात नातेवाईकांची सेवा करण्यासाठी गेला होता, त्यामुळे तो थोडक्यात बचावला. दरम्यान मंगळवारी दुपारपर्यंत अपघातग्रस्त मालमोटर जागेवरच उभी असल्याचे दिसून आले.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंकचे थाटात लोकार्पण ! “हा मिसिंग लिंक नव्हे तर कनेक्टिंग लिंक” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
– बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर ! राज्याचा एकूण निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी – पाहा सविस्तर निकाल
– शेतकऱ्यांनो… २० मे पूर्वी आपला फार्मर आयडी काढून घ्या, अन्यथा कृषी योजनांचा लाभ मिळणार नाही
– लोणावळा शहरातील पार्किंगची समस्या सुटणार, रेल्वे प्रशासन वाहनतळ विकसित करणार ; खासदार बारणे यांची माहिती


dainik maval jahirat

Previous Post

भाडेकरू ठेवताय ? आधी ही बातमी वाचा, ‘या’ एका चुकीमुळे 38 घरमालकांविरुद्ध गुन्हे दाखल

Next Post

राजीनाम्यांची खात्री न करता बरखास्तीचे आदेश… मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीवरील प्रशासक नियुक्तीला स्थगिती ; पणन मंत्र्यांचा निर्णय

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Maval Taluka Agricultural Produce Market Committee dissolved due to lack of quorum

राजीनाम्यांची खात्री न करता बरखास्तीचे आदेश... मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीवरील प्रशासक नियुक्तीला स्थगिती ; पणन मंत्र्यांचा निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lonavala Kumar Chowk to Tiger Point road project PMRDA Abhijit Chaudhari MLA Sunil Shelke on-site inspection

लोणावळा कुमार चौक ते टायगर पॉईंट रस्त्याला मिळणार गती ; पीएमआरडीए आयुक्त अभिजीत चौधरी, आमदार सुनील शेळके यांचा प्रत्यक्ष पाहणी दौरा

August 12, 2026
Traffic diversions for three hours on Connecting Link Missing Link of Mumbai-Pune Expressway

महत्वाची बातमी ! मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘कनेक्टिंग लिंक’वर (मिसिंग लिंक) बुधवारी तीन तास वाहतूक बदल

August 11, 2026
Individual found in possession of cannabis apprehended within Lonavala Rural Police Station limits

Lonavala Police : लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत गांजा बाळगणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

August 11, 2026
Four youths from Maval Taluka Pune died in an accident on Pune-Satara highway at Shirwal

Shirwal Satara Road Accident : शिरवळ येथे पुणे-सातारा महामार्गावर झालेल्या अपघातात मावळातील चार युवकांचा मृत्यू

August 11, 2026
Potholes plague the roads in rural areas of Maval Taluka

मावळ तालुक्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य !

August 11, 2026
Potholes on Indrayani River bridge near Takve Budruk risk of accidents for both two-wheelers four-wheelers

टाकवे बुद्रुक जवळील इंद्रायणी नदी पुलावर खड्डे ; खड्ड्यातून लोखंडी सळई बाहेर; दुचाकीसह चारचाकी वाहनांना अपघाताचा धोका

August 11, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.