वडगाव शहरातील ( Vadgaon Maval ) ढोरेवाडा येथील एका घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातून सुमारे 2 लाख रुपयांचा ऐवज चोरून ( Theft at Home ) नेल्याची घटना घडलीये. तसाच प्रयत्न आणखीन दोन ठिकाणी झाला. याबाबत शैलेंद्र रामचंद्र ढोरे (वय 51, रा. ढोरेवाडा, वडगाव मावळ) यांनी वडगाव मावळ पोलिस ( Vadgaon Maval Police ) ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
प्राप्त माहितीनुसार, शहरातील ढोरेवाडा येथे शैलेंद्र ढोरे हे तळमजल्यावर राहत असून त्यांचे भाऊ नगरसेवक राहुल ढोरे हे वरच्या मजल्यावर राहतात. सोमवारी सायंकाळी साडेसहा ते मंगळवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान, शैलेंद्र ढोरे यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश केला. ( Burglary In Vadgaon Maval Dorewada Area )
त्यावेळी घरातील दोन तोळ्याचे सोन्याचे गंठण, दोन अंगठ्या, कानातील झुमके, कानातील टॉप, रिंगा, राजकोट टॉप असा सुमारे 1 लाख 97 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. उपनिरीक्षक शीला खोत या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. दरम्यान, आंबेडकर कॉलनी आणि मयुरेश्वर कॉलनी येथेही चोरट्यांनी घरफोडीचा प्रयत्न केल्याने नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे.
अधिक वाचा –
मावळात महिलेची फसवणूक, भारतीय रेल्वेत नोकरी लावतो सांगत उकळले 8 लाख I Lonavla Crime
लोणावळ्यात किरकोळ कारणातून सफाई कर्मचारी महिलेला मारहाण, तरुणावर गुन्हा दाखल, कोयता जप्त I Lonavla Crime