पादचारी वृद्धाला धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बहुळ ( Bahul Village ) येथे घडली. रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या सदर व्यक्तीला पिकअप व्हॅनने ( Pick up van accident ) धडक दिली. यात सदर वृद्ध व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. मंगळवार (दिनांक 11 ऑक्टोबर) रोजी दुपारच्या सुमारास बहुळ गावच्या ( Bahul Village ) हद्दीत हा अपघात घडला.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
कोंडीराम साहेबराव साबळे (वय 62) असे अपघातात मृत्यू पावलेल्या वृद्धाचे नाव आहे. उमेश पांडूरंग साबळे (44, रा. बहूळ ता. खेड) यांनी या प्रकरणी चाकण पोलिस ठाण्यात ( Chakan Police Station ) फिर्याद दिली. त्यानुसार, पीकअपचालक मारूती जयवंत सातकर (40, रा. कान्हेफाटा. ता. मावळ) याच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत कोंडीराम साबळे हे बहुळ गावच्या हद्दीत रस्त्याच्या बाजूला उभे होते. त्या आरोपी चालवत असलेल्या टेम्पोने त्यांना धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या साबळे यांचा जागीच मृत्यू झाला. प्रकरणाचा पुढील तपास चाकण पोलिस तपास करत आहेत. ( Pick up Van Accident Elderly Person Death Chakan Police Station )
अधिक वाचा –
वडगावात ढोरेवाडा येथे घरफोडी, ‘इतक्या’ लाखाचा ऐवज लंपास, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण I Vadgaon Maval
मावळात महिलेची फसवणूक, भारतीय रेल्वेत नोकरी लावतो सांगत उकळले 8 लाख I Lonavla Crime